सिनेमा,मनोरंजन

जेठालाल एका एपिसोडच घेतो इतके मानधन

27 Aug :- ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही सब वाहिनीवर लागणारी मालिका खूपच प्रसिद्ध आहे. अनेक लोकांच्या मनावर बरेच वर्षापासून या मलिकने राज्य केले आहे. थोड्या दिवसापूर्वीच या मालिकेला सुरू होऊन 12 वर्ष पूर्ण झाले आहे. लॉकडाऊन मध्ये या मालिकेचे शूटिंग बंध होते. परंतु त्यानंतर परत जेव्हा या मालिकेचे शूटिंग सुरू झाले तेव्हापासून ही मालिका कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत रहात आली आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

थोड्या दिवसापूर्वीच या मालिकेतील अंजली नावाचे पात्र वैयक्तिक कारणाने मालिका सोडून गेले. त्यांनतर त्या जागी दुसऱ्या महिलेला अंजलीच्या रोल साठी सिलेक्ट केले आहे. या मालिकेतील प्रतेक पात्राचा अभिनय खूप छान असतो. कोणत्या ना कोणत्या कारणासाठी प्रतेक पात्र प्रसिद्ध आहे.भारतातील सर्वात लोकप्रिय मालिकांपैकी ही एक लोकप्रिय मालिका आहे. रोजच्या धावपळीच्या जीवनात, तान तनावाने भरलेल्या आयुष्यात, एक हास्याचा फवारा मारण्यासाठी ही मालिका खूप उपयोगी ठरते.

हे वाचा :- केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी सांगितले; कधी मिळणार भारतीयांना कोरोना लस?

यामध्ये अनेक नटरंगी पात्र आहेत ज्यांचे डायलॉग ऐकून प्रतेक जन हसल्याशिवाय रहात नाही.. प्रत्येकाची बोलण्याची एक वेगळीच स्टाइल असते. प्रत्येकाच्या अभिनयाची दर्जेदार कॉमेडी चाहत्यांना मोहून घेतेय.काहीही असले तरी या मालिकेत एक पात्र मालिकेचा जान आहे. त्या पात्राच नाव जेठांलाल म्हणजेच त्याच खर नाव आहे दिलीप जोशी. दिलीप जोशी मागील 12 वर्षापासून या मालिकेत टिकून आहेत.

हे वाचा :- …तर राज्यात शाळा सुरू होतील, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली महत्त्वाची माहिती

तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेत मुख्य भूमिकेत दयाबेन (दिशा वकानी) आणि जेठालाल (दिलीप जोशी) हे आहेत. या कार्यक्रमाचे हे दोघे सूत्रधार असल्यामुळे या दोघांना चांगली रक्कम मिळते. दिलीप जोशी यांना 50 हजार रुपये मानधन मिळते. महिन्यातून त्यांना 25 दिवस या मालिकेसाठी काम करावे लागते. त्यांना महिन्याचे सरासरी 15 लाख इतकी रक्कम मिळते. माहितीनुसार या मालिकेतील सर्वात जास्त मानधन घेणारे जेठांलाल हे एकमेव पात्र आहे.

हे वाचा :- मोठा दिलासा! राज्य सरकारने केला ‘हा’ टॅक्स माफ

तारक मेहता का उल्टा चश्मा हा कार्यक्रम काही दिवस अगोदरच चित्रीकरण करून ठेवण्यात येतो. ज्यामुळे या कार्यक्रमाची टीआरपी मजबूत राहील. अन्य कलाकारांनाही बरेच मानधन दिले जाते. प्रत्येक कलाकाराचे मानधन हे वेगवेगळ्या किमतीने दिले जाते. तारक मेहता का उल्टा चश्मा या कार्यक्रमात असे अनेक छोटे कलाकार आहेत ज्यांना वेगवेगळ्या रकमेचे मानधन दिले जाते. जसे अब्दुल हे पात्र साकारणारे अभिनेते 35 ते 40 हजार रुपये प्रती एपिसोड एवढे मानधन घेतात.

हे वाचा :- मंत्रिमंडळ बैठकीत घेतले ‘हे’ महत्वपूर्ण निर्णय!