महाराष्ट्र

महाराष्ट्राचे कोरोना अपडेट!

27 Aug :- राज्यात कोरोना विषाणूचा वाढता पसराव प्रशासन आणि नागरिकांची डोकेदुखी वाढवत आहे.कोरोनामुक्त होणाऱ्यांची वाढती आकडेवारी दिलासादायक आली तरी दररोज कोरोनाबाधित रुग्णांची वाढती आकडेवारी चिंताजनक होत चालली आहे.कोरोना विषाणूचा वाढत कहर सर्व सामान्य माणसांचे दैनंदिन जीवन विस्कळीत करून टाकत आहे. आज राज्यामध्ये कोरोना रुग्णवाढीची धक्कादायक नोंद झाली आहे.राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत उच्चांकी वाढ कायम आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

गुरुवारी 14 हजार 718 नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या ही 7 लाख 33 हजार 500 एवढी झाली आहे. तर 355 जणांचा मृत्यू झाला. गुरुवारी 9136 रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात 1 लाख 78 हजार जण करोनावर उपचार घेत आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 72.36 टक्के एवढं झालं आहे.कोरोना व्हायरसचं थैमान अजुनही सुरुच आहे.

हे वाचा :- केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी सांगितले; कधी मिळणार भारतीयांना कोरोना लस?

देशातल्या रुग्णांच्या संख्येने धोक्याची पातळी ओलांडली आहे. जेष्ठ आणि वयोवृद्ध नागरीकांना कोरोनाचा सर्वाधिक धोका असला तरी इतर काही आजार असलेल्यांनाही सर्वात जास्त धोका असल्यांच आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे.टी.बी.चा आजार असलेल्या नागरीकांना कोरोनाचा दुप्पट धोका असल्याचा इशारा आरोग्य मंत्रालयाने दिला आहे. अशा रुग्णांनी आपला आहार पौष्टिक राहिल याची काळजी घ्यावी असा सल्लाही डॉक्टरांनी दिला आहे.

हे वाचा :- राज्यात धार्मिकस्थळं, जीम सुरू होणार; संजय राऊत यांनी दिले संकेत!

कोरोना रुग्णांच्या एकूण संख्येत जवळपास 5 टक्के रुग्ण हे टी.बी.चा आजार असलेले होते. त्यामुळे टीबी असलेल्या सर्व रुग्णांची कोरोना चाचणी करावी असाही सल्ला देण्यात आला आहे.गेल्या काही दिवसांमध्ये देशात कोरोना रुग्णांच्या संख्येने उच्चांक गाठला असून दररोज 60 ते 70 हजारांच्या नव्या रुग्णांची भर पडत आहे. देशात कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही 33 लाखांच्या वर गेली आहे.तर कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या ही 25 लाखांच्या वरगेल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

हे वाचा :- मोठा दिलासा! राज्य सरकारने केला ‘हा’ टॅक्स माफ