अखेर सचिन मदतीसाठी धावला!
27 Aug :- नामवंत क्रिकेटपटूंच्या बॅट दुरुस्त करणारे अश्रफ हे सध्या हॉस्पिटलमध्ये आहेत. त्यांना पैशांची गरज आहे. अश्रफ यांच्या मदतीसाठी अखेर भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने धाव घेतल्याचे पाहायला मिळत आहे. अश्रफ यांना हॉस्पिटलमध्ये लागणारी आर्थिक मदत आता सचिन करणार असल्याचे पुढे आले आहे.
दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!
अश्रफ हे मुंबईतील एका हॉस्पिटलमध्ये दाखल झालेले आहेत. त्यांना काही आठवड्यांपासून किडनीची समस्या आहे. अश्रफ यांचे शुभचिंतक असलेले प्रशांत जेठमलानी हे अश्रफ यांच्यावर चांगले उपचार व्हावेत, यासाठी पैशांची जुळवाजुळव करत आहेत. पण सध्याच्या घडीला एकही क्रिकेटपटू अश्रफ यांच्या मदतीसाठी पुढे आलेला पाहायला मिळत नव्हते. काही जणांनी अश्रफ यांच्याकडून आपले काम करून घेतले आहे, पण त्यांना अजूनही पैसे दिलेले नाहीत.
हे वाचा :- केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी सांगितले; कधी मिळणार भारतीयांना कोरोना लस?
पण आता सचिनने अश्रफ यांच्या मदतीसाठी धाव घेतल्याचे पुढे आले आहे.मुंबईतील मेट्रो सिनेमाघराच्या जवळ अश्रफ यांचे एक दुकान आहे. काही दिवसांपूर्वी अश्रफ यांच्या भावाचे निधन झाले होते आणि आता ते हॉस्पिटलमध्ये दाखल झालेले आहेत. याबाबत प्रशांत यांनी सांगितले की, ” काही क्रिकेटपटूंनी अजूनही अश्रफ यांच्या कामाचे पैसेही दिलेले नाहीत. ते पैसे जर मिळाले असते तर ही वेळ आली नसती. पण अश्रफने अजूनही त्यांच्याकडे पैसे मागितलेले नाहीत.
हे वाचा :- …तर राज्यात शाळा सुरू होतील, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली महत्त्वाची माहिती
या कठीण प्रसंगी क्रिकेटपटूंनी अश्रफ यांची मदत करायला हवी.”अश्रफ यांचे मित्र प्रशांत यांनी मदतीसाठी आवाहन केल्यावर सचिन त्यांच्यासाठी पुढे आला आहे. गेल्या काही दिवसांपासून अश्रफ हे हॉस्पिटलमध्ये आहेत. आता त्यांच्या उपचारासाठी सचिन मदत करणार आहे. काही दिवसांपूर्वी जेव्हा कोणीही अश्रफ यांच्या मदतीसाठी यायला तयार नव्हते. तेव्हा बॉलीवूड अभिनेता सोनू सूदने अश्रफ यांना मदत करण्याचे ठरवले होते. पण सोनूपूर्वीच सचिनने अश्रफ यांना मदत केली आहे.