मोठा दिलासा! राज्य सरकारने केला ‘हा’ टॅक्स माफ
कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊन लावल्याने त्याचा मोठा आर्थिक फटका वाहतुकदारांना बसला आहे. गेल्या 5 महिन्यांपासून वाहनं बंद असल्याने लाखो लोकांचा रोजगारच बुडाला आहे. त्यामुळे गाड्यांचे हजारो रुपयांचे टॅक्स चुकवायचे कसे असा प्रश्न या व्यवसायिकांकडे होता. त्या सगळ्यांना राज्य सरकारने दिलासा देत मोठा निर्णय घेतला असून 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर 2020 पर्यंत संपूर्ण टॅक्समध्ये माफी देण्यात आलेली आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी ही माहिती दिली.
दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!
सरकारने 6 महिन्यांचा त्यांचा हा टॅक्स माफ केलेला आहे. या निर्णयाचा फायदा हा 11 लाख 40 हजार एवढ्या वाहनांना मिळेल. या निर्णयाचा सरकारच्या तिजोरीवर 700 कोटी रुपयांचा भार येईल. या वाहतूकदारांची मागणी होती की कोरोनाच्या काळामध्ये आम्ही बिलकुल धंदा केलेला नाही आणि आम्ही पूर्ण आर्थिक संकटात आहोत.
हे वाचा :- शाळा,कॉलेज सुरू करणं पडलं महागात!
त्या संकटातून सावरण्यासाठी त्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे असंही परब म्हणाले. आज मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
हे वाचा :- …आणि पंकजाताई भडकल्या!