महाराष्ट्राचे ‘धक्कादायक’ कोरोना अपडेट!
राज्यात कोरोना विषाणूचा वाढता पसराव प्रशासन आणि नागरिकांची डोकेदुखी वाढवत आहे.कोरोनामुक्त होणाऱ्यांची वाढती आकडेवारी दिलासादायक आली तरी दररोज कोरोनाबाधित रुग्णांची वाढती आकडेवारी चिंताजनक होत चालली आहे.कोरोना विषाणूचा वाढत कहर सर्व सामान्य माणसांचे दैनंदिन जीवन विस्कळीत करून टाकत आहे.
दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!
आज राज्यामध्ये कोरोना रुग्णवाढीची धक्कादायक नोंद झाली आहे.राज्यात बुधवारी पुन्हा एकदा विक्रमी 14 हजार 888 नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे राज्यातल्या कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ही 7 लाख 18 हजार 711वर गेली आहे.
हे वाचा :- शाळा,कॉलेज सुरू करणं पडलं महागात!
7,637 रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण 5,22,427 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 72.69% एवढे झाले आहे.
हे वाचा :- हिवाळ्यात कोरोना होणार आणखी गंभीर; जागतिक आरोग्य तज्ज्ञांचा विश्वास
राज्यात आज 295 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. सध्या राज्यातील मृत्यूदर 3.21 % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३७,९४,०२७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७,१८,७११ (१८.९४ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
हे वाचा :- या’ लोकांमुळेच भारतात होतोय कोरोनाचा पसराव!
सध्या राज्यात १२,६८,९२४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३३,६४४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सध्या एकूण १,७२,८७३ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
हे वाचा :- …आणि पंकजाताई भडकल्या!