भारत

सुखद बातमी! Oxford कोरोना लशीच्या मानवी चाचणीला प्रारंभ

26 Aug :- सर्व जगाचं लक्ष लागलेल्या Oxford University च्या लशीच्या मानवी परीक्षणाला पुण्यात सुरुवात होणार आहे. बुधवारपासून 26 ऑगस्ट ही चाचणी भारती विद्यापीठाच्या मेडिकल कॉलेजमध्ये सुरु होण्याची शक्यता आहे. मानवी चाचणीसाठी सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाने देशभरात निवडलेल्या 17 संस्थांमध्ये भारती विद्यापीठाचा समावेश होतो.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

जगभरातले तज्ज्ञांचं लक्ष या चाचणीकडे लागलं असून ही दुसऱ्या टप्प्यातली चाचणी आहे. सुरुवातीला 5 जणांवर या लशीचा प्रयोग करण्यात येणार आहे. या पाचही जणांच्या कोविड आणि इतर टेस्ट करण्यात येणार असून त्या निगेटिव्ह आल्या तरच त्यांना ही लस देण्यात येणार असल्याची माहिती डॉ. संजय लालवानी यांनी दिली.

हे वाचा :- शाळा सुरू करण्याबाबत घेतला मोठा निर्णय!

या चाचणीसाठी 18-99 या वयोगटातल्या 300 ते 350 जणांची निवड करण्यात आली आहे. सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या तर क्रमाक्रमाने ही लस देण्यात येणार आहे. त्याचे काय परिणाम होतात याचा सविस्तर अभ्यास करण्यात येणार आहे.पुण्यातल्या सीरम इन्स्टिट्यूट सोबत Oxfordने करार केला असून या लशीचं उत्पादनही पुण्यातच होणार आहे.या लशीच्या पहिल्या क्लिनिकल ट्रायलचा रिझल्ट समोर आला आहे आणि या लशीचा सकारात्मक परिणाम होत असल्याचं दिसून आलं आहे.

हे वाचा :- ऑनलाईन नको,शाळा सुरु करा- बच्चू कडू


ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने कोरोनावर शोधलेल्या ChAdOx1 nCoV-19 लशीची मानवी चाचणी झाली होती. त्याचे परिणाम जुलै महिन्यात जाहीर करण्यात आले. ते परिणाम सकारात्मक असून शास्त्रज्ञांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. जगप्रसिद्ध लॅन्सेट मासिकात याबाबतचा एक अहवाल जाहीर झाला आहे. त्यात ते निष्कर्ष देण्यात आले आहेत.या औषधाचे कुठलेही घातक परिणाम आढळून आलेले नाहीत.

हे वाचा :- ‘या’ लोकांमुळेच भारतात होतोय कोरोनाचा पसराव!

त्याचबरोबर प्रतिकार शक्तीही वाढल्याचं दिसून आल्याची माहिती देण्यात आली आहे. अँटिबॉडीज आणि पांढऱ्या पेशींची वाढ झाल्याचंही आढळून आलं आहे. कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी त्याचा मोठा उपयोग होते. हे परिमाण सकारात्मक असले तरी आणखी काही चाचण्यांची गरज असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

हे वाचा :- मोठा दिलासा; मोदी सरकारने ‘या’ वस्तूंवरील घटवला GST!