मुख्यमंत्री सहाय्यता निधीतील 409 कोटी रुपये पडून!
26 Aug :- कोरोना परिस्थिती लढा देत असताना राज्य सरकारला आर्थिक संकटाचा मोठा सामना करावा लागला. कोरोनावर मात करण्यासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीची घोषणा करण्यात आली होती. यात सर्वसामान्यांसह ते उद्योगपती, सेलिब्रिटी, राजकीय नेत्यांनी मदत केली. परंतु, जमा झालेल्या निधीतून किती खर्च झाला याची माहिती आता समोर आली आहे.
दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19 खात्यात देणगीदारांच्या मदतीने 541.18 कोटी रुपये जमा करण्यात आले असताना प्रत्यक्षात फक्त 132.25 कोटी रुपये खर्च केल्याची माहिती समोर आली आहे.
हे वाचा :- शाळा सुरू करण्याबाबत घेतला मोठा निर्णय!
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहिती अधिकाराच्या अंतर्गत खात्यात जमा झालेली एकूण रक्कम आणि वाटप केलेल्या रक्कमेचा तपशील मागविला होता.
हे वाचा :- ऑनलाईन नको,शाळा सुरु करा- बच्चू कडू