ऑनलाईन नको,शाळा सुरु करा- बच्चू कडू
25 Aug :- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात येताच प्रशासनाकडून काही महत्त्वाची पावले उचलली जाऊ लागली. दैनंदिन जीवनावर याचे थेट परिणाम पाहायला मिळाले. त्यातच शिक्षण व्यवस्थेवरही या परिस्थितीमुळे मोठे परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले. यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरु झाले असूनही कोरोनाचं संकट न टळल्यामुळे शाळा अद्यापही सुरू झाल्या नाही आहेत.
दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!
दरम्यान, शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या वक्तव्यातून याचे संकेत मिळाले आहेत. शिक्षण हे सार्वत्रिक असले पाहिजे.सगळ्यांना समान ते मिळाले पाहिजे. एक ऑनलाईन शिकत असेल मात्र गरीब ऑनलाईन शिकत नसेल तर हे होता कामा नये असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.
हे वाचा :- ‘या’ लोकांमुळेच भारतात होतोय कोरोनाचा पसराव!
गरीब आणि श्रीमंत अशी विषमता निर्माण होऊ नये यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिक्षणमंत्री वर्षा गायकवा़ड, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासोबत ५-६ वेळा व्हिसीद्वारे बैठका झाल्या, असेही त्यांनी म्हटले.यासाठी योग्य ते धोरण पाहिजे, सर्वांना शिक्षण १०० टक्के मिळाले पाहिजे. तसेच,उन्हाळ्याच्या सुट्ट्या रद्द करत जानेवारीपासून शाळा सुरु करा अशी मागणी केल्याचेही बच्चू कडू यांनी सांगितले आहे.
हे वाचा :- शाळा सुरू करण्याबाबत घेतला मोठा निर्णय!
या आधी,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही महाराष्ट्रातील शैक्षणिक वर्ष जानेवारी ते डिसेंबर करावी अशी मागणी युजीसीकडे केली होती त्याला युजीसीने हिरवा कंदिल दिला आहे. शिक्षण विभागातले सर्व उणीवा, अडथळे दुर करण्यासाठी हा प्रस्ताव मांडण्यात आला होता.
हे वाचा :-मोठा दिलासा; मोदी सरकारने ‘या’ वस्तूंवरील घटवला GST!
सद्यस्थिती पाहता शैक्षणिक वर्षासाठीचं धोरण निश्चित झाले पाहिजे, सर्वांना १०० टक्के शिक्षक मिळाले पाहिजे याच पार्श्वभूमीवर पुढील वर्षासाठीची उन्हाळ्याची सुट्टी रद्द करून जानेवारी पासून शाळा सुरू करण्यात याव्यात अशी सूचना आपण मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याची माहती शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अमरावतीत बोलताना दिली. कडू यांच्या या वक्तव्यामुळे आता जानेवारी महिन्यापासून शाळा सुरू होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.