राजकारण

केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांची प्रकृति चिंताजनक

25 Aug :- लोक जनशक्ती पक्षाचे प्रमुख आणि केंद्रीय अन्न पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांची प्रकृती ढासळली असून चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. त्यांच्यावर फोर्टिस एर्स्कॉर्ट्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पासवान यांच्या फुफ्फुसात संसर्ग झाला असून मूत्रपिंडही निकामी झाले आहे. पासवान यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले. पासवान यांना रविवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, पासवान यांची प्रकृती स्थिर असली तरी त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. पासवान यांना आधीपासूनच हृदयविकाराचा त्रास आहे.पासवान यांच्या प्रकृतीबद्दल माहिती देताना डॉक्टर म्हणाले की, पासवान यांच्या प्रकृतीत अद्याप सुधारणा झालेली नाही. पासवान यांना आधीपासून हृदयविकार असल्याने त्यांचे हृदय कमजोर झाले आहे. अशा परिस्थितीत त्यांच्यावर शस्त्रक्रिया करणेही शक्य नसल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

हे वाचा :- शाळा सुरू करण्याबाबत घेतला मोठा निर्णय!

केंद्रात मंत्री असलेल्या पासवान यांच्याकडे धान्य पुरवठा आणि ग्राहक तक्रार निवारण मंत्रालयाची जबाबदारी आहे. पासवान यांचा बिहारमधील लोक जनशक्ती पक्ष हा राज्यात मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे संयुक्त जनता दल आणि भाजपसोबत सत्तेत सहभागी आहे. पासवान यांनी गेल्या 32 वर्षांत 11 वेळा निवडणूक लढवली आहे. यात ते 7 वेळा जिंकले आहेत. तसंच त्यांनी केंद्रात सातवेळा मंत्री म्हणून काम केले आहे. बिहारमधील हाजीपूर लोकसभा मतदारसंघाचे अनेकवेळा प्रतिनिधित्व त्यांनी केले आहे. सध्या ते राज्यसभेचे सदस्य आहेत.

हे वाचा :- मोठा दिलासा; मोदी सरकारने ‘या’ वस्तूंवरील घटवला GST!

बिहारमध्ये सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. राज्यात पुन्हा एकदा जेडीयू, भाजप आणि लोक जनशक्ती पक्ष एकत्र निवडणूक लढवणार आहेत. तसंच राज्यातील पक्षाची धुरा पासवान यांचे पुत्र चिराग पासवान सांभाळत आहेत. मागील काही काळापासून चिराग पासवान आणि मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. दोन्ही पक्ष एकमेकांवर टीका करीत असल्यानं राज्यातील सत्ताधारी आघाडीत बिनसल्याची चर्चा सुरु आहे.

हे वाचा :- कोरोना रुग्णानाने हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारत केली आत्महत्या!