भारत

ICU मध्ये लागली आग; रुग्णांना खिडकीतुन काढलं बाहेर!

25 Aug :-  कोविडच्या प्रकोपामुळे सगळे हॉस्पिटल्स हाऊसफुल्ल आहेत. आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आहे. 

मंगळवारी गुजरातमधल्या जामनगरमधल्या सरकारी हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात ICU आग लागली. आग लागल्याने प्रचंड गोंधळ झाला. शेवटी लोकांनी खिडकी तोडून 9 रुग्णांना बाहेर काढलं. त्यामुळे या रुग्णांचे प्राण वाचले.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

हे वाचा :- कोरोना रुग्णानाने हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारत केली आत्महत्या!

या रुग्णांना आता दुसऱ्या वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं सांगितलं जात आहे. आयसीयूमध्ये सगळं बंदिस्त असल्याने आग लागल्यानंतर लगेच धूर जमा झाला.नेमकं काय झालं हे कुणालाच कळलं नाही. नंतर एकच धावपळ झाली.

हे वाचा :- शाळा सुरू करण्याबाबत घेतला मोठा निर्णय!

शेवटी हॉस्पिटलच्या लोकांच्या मदतीला रुग्णांचे नातेवाईक आणि आजुबाजूचे लोक धावून आलेत.लोकांनी खिडकी तोडून रुग्णांना तातडीने बाहेर काढलं. यावेळी रुग्णांचे प्रचंड हाल झाले. ICUमध्ये असणारे रुग्ण हे गंभीर असतात. त्यामुळे जास्त खळबळ उडाली. शेवटी लोकांनी खिडकीमधून कसं बसं त्या सगळ्यांना बाहेर काढण्यात यश मिळवलं आणि मोठी दुर्घटना टळली.

हे वाचा :- मोठा दिलासा; मोदी सरकारने ‘या’ वस्तूंवरील घटवला GST!