भारत

सोनू सूदने विद्यार्थ्यांसाठी केली केंद्र सरकारकडे ‘ही’ मागणी

25 Aug :- देशातील कोरोनाची परिस्थिती पाहता अनेक परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नीट NEET आणि जेईई परीक्षाही रद्द कराव्यात अशी मागणी पालक आणि विद्यार्थ्यांनी केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली. त्यानंतर राष्ट्रीय परीक्षा एजन्सीनं परीपत्रक जारी केलं आणि परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

सप्टेंबरमध्ये या परीक्षा होणार आहेत. मात्र परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात टाकू नका, परीक्षा पुढे ढकला. अशी विनंती अभिनेता सोनू सूदने केंद्र सरकारकडे केली आहे.सोनू सूदने जीईई आणि नीटची परीक्षा पुढे ढकलाव्यात, अशी मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. याबाबत त्याने ट्वीट केलं आहे.

हे वाचा :- कोरोना रुग्णानाने हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारत केली आत्महत्या!

सोनू सूद म्हणाला, “देशातील सध्याची परिस्थिती पाहता नीट आणि जीईई त्या परीक्षा पुढे ढकलाव्यात अशी माझी केंद्र सरकारकडे विनंती आहे. सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीत आपण खूप काळजी घ्यायला हवी, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालू नये” कोरोना काळात ही परीक्षा रद्द करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली होती.

हे वाचा :- शाळा सुरू करण्याबाबत घेतला मोठा निर्णय!

कोरोनाच्या काळात सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या असताना NEET आणि JEE घेणे धोक्याचे ठरू शकते. असं म्हटलं होतं. कोरोनामुळे ही परीक्षा जुलैपर्यंत पुढे ढकलण्यात आली. दरम्यान कोरोनाची वाढती प्रकरणं लक्षात घेता सप्टेंबरमध्ये या परीक्षा होणार आहेत.जेईईची मुख्य परीक्षा ठरलेल्या तारखेप्रमाणे 1 ते 6 सप्टेंबरदरम्यान होणार आहे. तर नीट परीक्षा 13 सप्टेंबरला होणार आहे.

हे वाचा :- Unlock-4; ‘हे’ नवे नियम जाहीर होण्याची शक्यता

नीट परीक्षेसाठी 15,97,433 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. याआधी सर्वोच्च न्यायालयानं जेईई आणि नीट परीक्षा कोरोनामुळे रद्द करण्यासंदर्भात 11 विद्यार्थ्यांची याचिका फेटाळून लावली होती.कोरोना काळात सोनू सूद अनेक गरजूंसाठी धावून आला आहे. प्रवासी मजुरांना त्यांच्या राज्यात पोहोचवलं. त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला त्यांना घराचीही ऑफर दिली आहे. याशिवाय पूरग्रस्तांनाही त्याने मदतीचा हात दिला. अनेकांना शिक्षण आणि उपचारासाठीदेखील आवश्यक ती मदत त्याने पुरवली आहे.

हे वाचा :- मोठा दिलासा; मोदी सरकारने ‘या’ वस्तूंवरील घटवला GST!