‘या’ लोकांमुळेच भारतात होतोय कोरोनाचा पसराव!
25 Aug :- देशामध्ये सर्वत्र कोरोना विषाणूचे थैमान सुरु आहे.सरकार अनेक अक्कल-युक्त्या लढवून कोरोना विषाणूचा वाढता पसरावं आटोक्यात आणण्याचा प्रयत्न कार्ट आहे.हा प्रयत्न सपशेल अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे.कोरोना विषाणूचा पसराव दिवसेंदिवस वाढण्यामागचं कारण ICMR ने स्पष्ट केले आहे.
दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!
भारतात कोरोना व्हायरसचा प्रसार होण्यास बेजबाबदार, काळजी न घेणारे आणि मास्क न घालणारे लोकच जबाबदार आहेत असा इशारा ICMRचे प्रमुख बलराम भार्गव यांनी दिला आहे. भारतातल्या कोरोना रुग्णांची आकडेवारी देत त्यांनी देशातली परिस्थिती नियंत्रणात असल्याचं स्पष्ट केलं.भारतातील 0.29 टक्के रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत तर 1.92 टक्के रुग्ण आयसीयूमध्ये तर 2.7 टक्के रुग्णांना ऑक्सिजन देण्यात आलेला आहे.
हे वाचा :- शाळा सुरू करण्याबाबत घेतला मोठा निर्णय!
मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये 69 टक्के पुरुष आहेत तर 31 टक्के महिला आहेत.तर मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये 50 टक्के रुग्ण हे 60 वर्षांच्या वरच्या वयोगटाचे आहेत.देशात कोरोनाने मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये 17 वर्षांपेक्षा कमी वयाचे 1 टक्के रुग्ण 18-25 एक टक्के रुग्ण, 26-44 वयोगटाचे 11, 45-60 वयोगट 36 तर 60पेक्षा जास्त वयोगटाचे 51 टक्के रुग्ण आहेत.
हे वाचा :- मोठा दिलासा; मोदी सरकारने ‘या’ वस्तूंवरील घटवला GST!