कोरोना रुग्णाने हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावरून मारली उडी!
25 Aug :- राज्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे.कोरोना विषाणूचे संक्रमण दिवसेंदिवस वाढत असले तरी कोरोनाच्या कचाट्यातून अनेक रुग्ण मुक्त होत असल्याची सुखद आकडेवारी समोर येत आहे.मात्र लोकांनी कोरोनाची एवढी धास्ती घेतली आहे की काही हरीणकाळजाची लोक कोरोनाची लागण होताच जीवनयात्रा संपवून टाकत आहेत.
दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!
अहमदनगरमध्येही कोरोनाचे अनेक रुग्ण सापडले आहेत.सर्वसामान्यांनी कोरोनाचा धसका घेतला आहे. त्यातच एका रुग्णाने रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली. या रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती आज तोफखाना पोलिसांनी दिली.अहमदनगर शहरातील गुलमोहर रोडवरील एका रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णाने रुग्णालय इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली.
हे वाचा :- Unlock 4 बाबद मुख्यमंत्र्यांनी दिले ‘हे’ संकेत!
गंभीर जखमी झालेल्या या रुग्णाचा रुग्णालयात मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. आज पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली.आत्महत्या केलेला 32 वर्षीय रुग्ण पाथर्डी तालुक्यातील आहे. त्याच्यावर अनेक दिवसांपासून स्थानिक रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. सोमवारी रात्री त्याला अहमदनगर शहरातील सुरभी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
हे वाचा :- शाळा सुरू करण्याबाबत घेतला मोठा निर्णय!
तेथे तिसऱ्या मजल्यावरील रुममध्ये उपचार सुरू होते. पहाटेच्या सुमारास त्याने खिडकीची काच फोडून खाली उडी मारली.तिसऱ्या मजल्यावरून उडी मारल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर त्याच रुग्णालयात उपचार सुरू होते. या रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी पोलिसांकडून चौकशी सुरू असल्याचं सांगण्यात आलं आहे.
हे वाचा :- मोठा दिलासा; मोदी सरकारने ‘या’ वस्तूंवरील घटवला GST!