सिनेमा,मनोरंजन

‘ही’ अभिनेत्री साकारणार आंजली भाभीची भूमिका!

25 Aug :- घरा-घरांमध्ये लोकप्रिय असणारी आणि दिवसभर पाहण्यात येणारी विनोदी मालिका तारक मेहताका उल्टा चश्मा लॉकडाऊन नंतर प्रेक्षकांना सध्या निराशाजनक धक्के देत आहे.या मालिकेतील सर्वच कलाकार लोकप्रिय झालेले आहेत.मात्र या मालिकेतील काही कलाकारांनी अचानक मालिकेला राम राम केल्याने चाहता वर्ग चांगलाच निराश झालेला दिसत आहे. आगोदर अंजली भाभीची भूमिका साकरणारी नेहा मेहतानाने मालिकेला अलविदा केला आणि त्यानंतर लगलीच या मालिकेतील रोशन सिंग सोढिने देखील मालिका सोडल्याच स्पष्ट झालं आहे.

एका वृत्तानुसार, टीव्ही अभिनेत्री सुनैना फौजदार ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेमध्ये नेहाची जागा घेणार आहे. रविवारपासून ती या शोचे शूटिंग सुरू करणार असल्याच्या बातम्याही आहेत. गेल्या 12 वर्षांपासून अंजलीच्या रुपात प्रेक्षकांच्या मनामध्ये असलेली नेहा आता हा शो सोडत आहे.

त्यामुळे चाहते सोशल मीडियावर आपली नाराजी व निराशा व्यक्त करीत आहेत. पण 12 वर्षांपासून या शो मध्ये काम करणाऱ्या नेहाने या शो पासून विभक्त होण्याचा निर्णय का घेतला हे आतापर्यंत निर्मात्यांनी सांगितलेले नाही. सुनैना फौजदार एक प्रसिद्ध अभिनेत्री देखील आहे.जिने अनेक मालिकांमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावलेले आहे.

‘लेफ्ट राइट लेफ्ट’ पासून ‘बेलन वाली बहु’ पर्यंत अनेक मालिकांमध्ये तिने काम केले आहे. आता ती अंजलीची भूमिका साकारणार आहे, पण ती हि भूमिका कशी साकारते आणि प्रेक्षकांना ती आवडेल का हे आता पाहावे लागेल.त्याचबरोबर मालिकेमध्ये रोशनसिंग सोढी म्हणून सर्वांना परिचित असलेल्या गुरचरण सिंगनेही हि मालिका सोडली आहे.

बलविंदरसिंग सूरी यांनी त्यांची जागा घेतली असल्याचे सांगण्यात आले आहे. ही दुसरी वेळ आहे जेव्हा गुरचरण सिंगने हि मालिका सोडली आहे.काही वर्षांपूर्वीदेखील त्याने या मालिकेतून सुट्टी घेतली होती. पण नंतर निर्मात्यांनी त्याला समजावल्यानंतर तो परत आला होता. पण यावेळी त्याला परत आणणे कठीण झाले आहे.