महाराष्ट्र

Unlock 4 बाबद मुख्यमंत्र्यांनी दिले ‘हे’ संकेत!

24 Aug :- राज्यभरात सध्या सर्वत्र कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अनलॉक ३ सुरु आहे. मात्र सध्या राज्यातील अनलॉक ३ पूर्ण होत आले असून सध्या सर्वांना प्रश्नपडला आहे राज्यातील अनलॉक ४ बाबदचा.देशात जूनपासून मिशन बिगेन सुरु करण्यात आले असले तरी महाराष्ट्रात अनलॉक Unlock-4 करण्याची घाई करणार नाही असे स्पष्ट मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

आधी सर्व सुरु करायचे आणि नंतर बंद करण्याची वेळ येऊ नये, त्यामुळे खात्री झाल्याशिवाय अनलॉकचा निर्णय घेतला जाणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. कोरोना नियंत्रणात येतोय ही चांगली बाब असली तरी कौतुकाचे बळी पडू नका, कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते, हा जगाचा अनुभव असल्याने गाफीलही राहू नका असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं.

हे वाचा :- भारतात हल्ले घडवून आणण्याचं पाकिस्तानचं षडयंत्र उघडकीस!

केंद्र सरकारने अनलॉक-4 ची प्रक्रिया सुरु केली असून गृहमंत्रालय लवकरच नव्या गाईडलाईन्स जारी करणार आहेत.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा सोमवारी ठाणे पालिका मुख्यालयाच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात घेतला.

हे वाचा :- भारताविरोधात माजोड्या चीनने उचललं ‘हे’ पाऊल

यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि तीनही महापालिकांचे आयुक्त आणि सर्व अधिकारी उपस्थित होते.

हे वाचा :- गांधी-नेहरू परिवाराचं अस्तित्व संपलं!