महाराष्ट्र

महाराष्ट्राचे ‘सुखद’ कोरोना अपडेट!

24 Aug :- राज्यात कोरोना विषाणूचा वाढता पसराव प्रशासन आणि नागरिकांची डोकेदुखी वाढवत आहे.कोरोनामुक्त होणाऱ्यांची वाढती आकडेवारी दिलासादायक आली तरी दररोज कोरोनाबाधित रुग्णांची वाढती आकडेवारी चिंताजनक होत चालली आहे.कोरोना विषाणूचा वाढत कहर सर्व सामान्य माणसांचे दैनंदिन जीवन विस्कळीत करून टाकत आहे. आज राज्यामध्ये कोरोना रुग्णवाढीची धक्कादायक नोंद झाली आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!


गेल्या 24 तासांत पुन्हा एकदा 11,015 नव्या कोरोना रुग्णांंची भर पडली आहे.महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी 14,219 रुग्णांना घरी सोडण्यात आलं. याचा अर्थ नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या बऱ्याच दिवसांनी अधिक आली आहे. ही त्यातल्या त्यात दिलासादायक बाब असली, तरीही कोरोनाचा आलेख अजूनही सपाट झालेला नाही.

हे वाचा :- भारतात हल्ले घडवून आणण्याचं पाकिस्तानचं षडयंत्र उघडकीस!


राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या आता 6,93,398 झाली आहे. यातले 5,02,49 जण बरे झालेले आहेत. मृत्यूचा आकडा 22465 वर गेला आहे. राज्यभरात उपचार सुरू असलेले तब्बल 1,68,126 रुग्ण आहेत. ही ऍक्टिव्ह रुग्णांची वाढती संख्या हा चिंतेचा विषय आहे.गेले काही दिवस सलग 14 हजारांवर नवे रुग्ण 24 तासांत दाखल होत होते. त्यामुळे राज्याच्या

हे वाचा :- भारताविरोधात माजोड्या चीनने उचललं ‘हे’ पाऊल

ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 1,68,126 एवढी झाली आहे. कुठल्याही दुसऱ्या राज्यात एवढ्या संख्येने उपचाराधीन कोरोनारुग्ण नाहीत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आंतरजिल्हा एसटी सेवा सुरू होत असतानाच ही विक्रमी रुग्णवाढ झाल्याने पुन्हा एकदा चिंता वाढली आहे.

हे वाचा :- गांधी-नेहरू परिवाराचं अस्तित्व संपलं!