राजकारण

‘या’ कारणामुळे काँग्रेसचे 11 आमदार बसणार उपोषणाला!

24 Aug :- जालना जिल्ह्यात काँग्रेसच्या ताब्यात तीन नगरपालिका आहेत. यामध्ये अंबड, परतूर आणि जालना आहेत. जिल्ह्यातील नगरपालिकेसाठी आतापर्यत 29 कोटी रुपयांचा निधी आला होता. मात्र. काँग्रेसच्या नगरपालिकांना या निधीतून दमडीही दिली नसल्याचा आरोप गोरंट्याल यांनी केलाय.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

काँग्रेसचे 11 आमदार उपोषणाला बसणार असल्याची माहिती जालन्याचे काँग्रेसचे आमदार कैलास गोरंटयाल यांनी दिलीय. त्यांच्या या दाव्याने महाविकास आघाडी मधील वाद चव्हाट्यावर आला आहे. निधी वाटपा बाबत काँग्रेसच्या आमदारांसोबत दुजाभाव होत असल्याचा आरोप गोरंट्याल यांनी केलाय. याबाबत राज्यातील पक्षश्रेष्ठींशी चर्चा केली असून मुख्यमंत्र्यांशीही बोलनं झालंय. मात्र, अद्याप काही न्याय मिळाला नसल्याची भावना गोरंट्याल यांनी व्यक्त केली.

हे वाचा :- ‘या’ कारणामुळे पुन्हा राहुल गांधींना अध्यक्ष बनवा!

लवकर सोनिया गांधींचीही भेट घेणार असल्याचं गोरंट्याल यांनी म्हंटलं आहे.दरम्यान आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी राज्यातील पक्षश्रेष्टींशी बोलणं झालं असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याही कानावर घातलं असल्याचं गोरंट्याल यांनी म्हंटलंय.

हे वाचा :- रशियाला व्हॅक्सीन निर्मितीसाठी हवी आहे भारताची मदत!

मात्र, अद्याप आम्हाला न्याय मिळाला नसून लवकरच काँग्रेस पक्ष प्रमुख सोनिया गांधी यांची भेट घेणार असल्याचंही गोरंट्याल यांनी सांगितलं. आगामी विधानसभा अधिवेशनात माझ्यासह सर्व 11 आमदार उपोषणाला बसणार किंवा सभात्याग करू असा इशाराही त्यांनी दिलाय.

हे वाचा :- मोठा धक्का! मुंबई इंडियन्सचा ‘हा’ स्टार गोलंदाज नाही खेळणार…