भारत

भारतात हल्ले घडवून आणण्याचं पाकिस्तानचं षडयंत्र उघडकीस!

24 Aug :- भारतात दहशतवादी हल्ले घडवून आणण्यासाठी पाकिस्तानने आता नवी चाल खेळली आहे. पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI यासाठी सक्रिय असून आता भारतातल्या गँगस्टर्स आणि गुंडांना हाताशी धरून हल्ले घडवून आणण्याची योजना आखत असल्याची खळबळजनक माहिती उघड झाली आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

सुरक्षा दलांनी दहशतवादी संघटनांविरुद्ध धडक मोहिम हाती घेतल्याने त्यांचं कंबरडं मोडलं असून आता नवा डाव पाकिस्तान खेळत असल्याची माहिती आहे.स्थानिक गुंड आणि गँगस्टर्स यांचं स्थानिक पातळीवर नेटवर्क असतं. त्या नेटवर्कचा उपयोग करून घातपात घडविण्याची ही योजना आहे. पंजबामध्ये यासंबंधातल्या काही घटना उघडकीस आल्याने गुप्तचर विभागाने सर्वच स्तरावर याबाबत सतर्कतेचा इशारा दिला आहे.यातले अनेक गँगस्टार्स हे फरार आहेत किंवा काही जेलमध्ये आहेत.

हे वाचा :- भारताविरोधात माजोड्या चीनने उचललं ‘हे’ पाऊल

त्या सगळ्यांशी संपर्क स्थापन करण्याचं काम दहशतवादी करत असून त्यांची मदत घेत घातपात घडविण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.या गुंडांना पैशांचं अमिश दाखखवून त्यांच्याकडून हे काम करून घेतलं जाण्याची शक्यता आहे. किंवा त्यांच्या नेटवर्कचा वापर करून दहशतवादी घातपात घडविण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हे वाचा :- …आणि कोरोना रुग्णालयातच सुरु केली दारू पार्टी!

दरम्यान, राजधानी दिल्लील्या धौलाकुआं भागातून अटक केलेल्या आयएसआयएस (ISIS) च्या दहशतवादाच्या घरात स्फोटकांचा साठा सापडला आहे. या स्फोटकांचा वापर करून दिल्लीला दाहरविण्याचा अतिरेक्यांचा डाव उधळला गेला आहे. दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) अबू यूसुफ (Abu Yusuf) उर्फ मुस्तकीम याला अटक केली होती. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापे घातले त्यात हा शस्त्रसाठा सापडला आहे.

हे वाचा :- मोठा धक्का! मुंबई इंडियन्सचा ‘हा’ स्टार गोलंदाज नाही खेळणार…