राजकारण

गांधी-नेहरू परिवाराचं अस्तित्व संपलं!

24 Aug :- काँग्रेस कार्यसमितीची आजची बैठक वादळी ठरली आहे. सोनिया गांधी यांचा राजीनाम्याचा प्रस्ताव. त्यानंतर राहुल गांधी यांचं कथित वक्तव्य आणि त्यानंतर सुरु झालेली चर्चा यामुळे दिल्लीचं वातावरण तापलं आहे. काँग्रेसच्या एका गटाला राहुल गांधी अध्यक्ष व्हावेत असं वाटतं तर दुसरा गट सोनिया गांधी यांच्यासाठी आग्रही आहे.या सगळ्या नाट्यात आता ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांची एन्ट्री झाली असून त्यांनी राहुल गांधी यांच्यासाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

राहुल यांनीच पक्षाचं अध्यक्षपद स्वीकरावं असा आग्रह त्यांनी धरल्याची माहिती दिली जातेय. त्यामुळे आता पक्षाच्या धोरणाची पुढची दिशा ठरण्याची शक्यता आहे. सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार असलेले अहमद पटेल हे काँग्रेसचे चाणक्य समजले जातात.राहुल गांधी यांच्या वक्तव्यामुळे ज्येष्ठ नेते नाराज झाले आहेत. काँग्रेसमधल्या अध्यक्षपदाच्या नाट्याने दिल्लीतलं राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.

हे वाचा :- आता केवळ ‘या’ लोकांच्याच होणार कोरोना चाचण्या!

काग्रेस कार्यसमितीच्या वादळी बैठकीत आरोप-प्रत्यारोप झाल्याने चर्चेला उधाण आलं आहे. हीच संधी साधत भाजप नेत्यांनी काँग्रेसवर टीका करायला सुरुवात केली आहे. भाजपच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. आता राजकारणातून नेहरु आणि गांधी घराण्याचं अस्तित्व संपलं अशी टीका उमा भारती यांनी केलीय.उमा भारती म्हणाल्या, काँग्रेसमध्ये जे काही सुरू आहे त्यामुळे पक्षाची स्थिती दिसून येते.

हे वाचा :- मोठा धक्का! मुंबई इंडियन्सचा ‘हा’ स्टार गोलंदाज नाही खेळणार…

पक्षाने आणि खऱ्या गांधी वादाकडे गेलं पाहिजे. पक्षाला विदेशी नाही तर स्वदेशी गांधींची गरज आहे. विदेशी गांधीमुळे पक्षाचं भलं होणार नाही असंही त्या म्हणाल्या. उमा भारती यांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

हे वाचा :- मोठी बातमी! रोशन सिंग सोढीचा अलविदा…