महाराष्ट्र

अखेर, मुख्यमंत्र्यानी सांगितले कोरोना लस कधी येणार?

24 Aug :- कोरोना विषाणूने राज्यभरात सावत्र हाहाकार केला आहे.कोरोना विषाणूने राज्यातील मानवी जीवन पूर्णतः विस्कळीत करून टाकले आहे.अशा परिस्थितीमध्ये कोरोना विषाणूला थोपवण्यासाठी कोरोना लस कधी येणार हा मोठा प्रश्न नागरिकांच्या मनात घर करून आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!


‘करोनावरील प्रतिबंधात्मक लस येण्यास डिसेंबर महिना उजाडणार असल्याने आणखी चार महिने असेच काढावे लागणार आहेत. आगामी काळात विविधधर्मिय सण असल्यानं पुढचा टप्पा महत्त्वाचा आहे. त्यामुळे गर्दी अपरिहार्य असली तरी नागरिकांनी गाफील राहू नये,’ असा सूचनावजा इशारा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. पुण्यातील सीईओपी कोव्हिड १९ रुग्णालयाचे उद्घाटन आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने झाले त्यावेळी ते बोलत होते.पुण्यात करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत स्वतंत्र कोव्हिड सेंटर तसंच वैद्यकिय व्यवस्था उभी करण्यात यावी अशी मागणी सातत्याने होत होती.

हे वाचा :- आता केवळ ‘या’ लोकांच्याच होणार कोरोना चाचण्या!

या पार्श्वभूमीवर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) सुसज्ज कोव्हिड सेंटर फक्त १८ दिवसांत बांधून पूर्ण केलं आहे. या कोव्हिड सेंटरचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज पार पडले.’डिसेंबरमध्ये लस येईलच पण महाराष्ट्रातील जनता ११ ते १२ कोटींच्या घरात आहेत त्यामुळं ती लस आल्यानंतर त्याची इम्युनिटी किती असणार, कशी मिळणार या गोष्टी लक्षात घेतल्यानंतर तूर्त नागरिकांनी मास्क, हात धणे, एकमेंकापासून अंतर ठेवणं हे नागरिकांनी पाळणे हाच उपाय आहे. असंही ते म्हणाले. करोनाची लाट ओसरल्यानंतर दुसरी लाट येत असल्याचा जगभरातला अनुभव आहे, त्यामुळं जंबो कोव्हिड सेंटरची आवश्यकता आहे.

हे वाचा :- राहुल गांधीनी अध्यक्षपद नाकारल्यास कोण सांभाळणार काँग्रेसची धुरा?

रुग्णांची संख्या कमी होत असताना अशा जम्बो सेंटरची आवश्यकता आहे का असे प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. मात्र, यापुढे गाफील राहून चालणार नाही,’ असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच, ‘पुण्यात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात उभारण्यात आलेल्या जम्बो सेंटरमध्ये अत्याधुनिक साधनसामग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये अण्णासाहेब मगर मैदान येथे; तसेच बालेवाडी येथे जम्बो सेंटर उभारण्यात येत आहेत,’ असंही ते म्हणाले.

हे वाचा :- ‘या’ कारणांमुळे बस प्रवाशांमध्ये नाराजी!