…आणि कोरोना रुग्णालयातच सुरु केली दारू पार्टी!
24 Aug :- कोविड रुग्णांवर उपचारासाठी सर्व देशभर सेंटर्स तयार करण्यात आले आहेत. त्या सेंटर्समध्ये राहण्याबाबत सरकारने काही नियम तयार केले आहेत. मात्र एका घटनेने झारखंड सरकार आणि पोलिसांची अब्रू चव्हाट्यावर आली आहे. आरोपी दारु पार्टी करत असतांनाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहे.
दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!
धनबादमधल्या कोविड सेंटरमधली ही घटना आहे. या आरोपीच्या हातात बेड्या आहेत. मात्र तो राजरोसपणे दारु पितांना दिसत आहे. हा आरोपी पार्टी करत असतांना पोलीस कुठे होते असा प्रश्न आता विचारला जात आहे.तर राज्य सरकारने एक चौकशी समिती तयार केली असून दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल असं मुख्यमंत्री सोरेन यांनी म्हटलं आहे.