महाराष्ट्र

महाराष्ट्राचे कोरोना अपडेट!

23 Aug :- राज्यात कोरोना विषाणूचा वाढता पसराव प्रशासन आणि नागरिकांची डोकेदुखी वाढवत आहे.कोरोनामुक्त होणाऱ्यांची वाढती आकडेवारी दिलासादायक आली तरी दररोज कोरोनाबाधित रुग्णांची वाढती आकडेवारी चिंताजनक होत चालली आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

कोरोना विषाणूचा वाढत कहर सर्व सामान्य माणसांचे दैनंदिन जीवन विस्कळीत करून टाकत आहे. आज राज्यामध्ये कोरोना रुग्णवाढीची धक्कादायक नोंद झाली आहे.राज्यात रविवारी 10,441 नवे रुग्ण आढळून आलेत तर 258 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातल्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता 6,82,383 एवढी झाली आहे.

हे वाचा :- राहुल गांधीनी अध्यक्षपद नाकारल्यास कोण सांभाळणार काँग्रेसची धुरा?

संख्या 7 लाखांच्या जवळ गेल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. तर आत्तापर्यंत 4,88,271 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या 1,71,542 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट हा 71.55 एवढा झाला आहे. तर मृत्यू दर हा 3.26 एवढा आहे.

हे वाचा :- आता केवळ ‘या’ लोकांच्याच होणार कोरोना चाचण्या!