बीड

सुखद! आज ‘116’ रुग्ण कोरोनामुक्त!

बीड जिल्ह्यातील आजवरची कोरोना स्थिती!

23 Aug :- दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव जिल्ह्यातील नागरिकांची आणि प्रशासनाची डोकेदुखी ठरत असला तरी जिल्ह्यात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची वाढती संख्या दिलासा देणारी ठरत आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

कोरोना विषाणूची भीती बाजूला ठेवून योग्य ती ‘खबरदारी’ घेतल्यास नक्कीच कोरोनाशी लढा देता येतो हे स्पष्ट होऊ लागले आहे.आज बीड जिल्ह्यामध्ये कोरोनमुक्त होणाऱ्यांची संख्या उच्चांकी पोहचली आहे. तब्ब्ल आज बीड जिल्ह्यातून तब्बल 116 रुग्णांना कोरोनमुक्तीची पावती मिळाली आहे.त्यामुळे डिस्चार्ज मिळालेल्या बीड जिल्ह्यातील रुग्णांची संख्या आता 2551 वर पोहोचली आहे.

हे वाचा :- आता केवळ ‘या’ लोकांच्याच होणार कोरोना चाचण्या!

आजपर्यंत बीड जिल्ह्यातील एकूण 3826 रुग्णांना कोरोनाची लागण झालेली आहे.आजवर बीड जिल्ह्यातून एकूण 99 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.तर रुग्णालयात दाखल आसलेल्या ऍक्टिव्ह बाधितांची संख्या 1680 आहे.जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रेट 7.2% आहे.तर रिकव्हरी रेट 53.66 % आहे.
त्यामुळे नागरिकांनो घाबरू नका…काळजी घ्या!

हे वाचा :- पंकजा मुंडेंची मोठी घोषणा, नव्याने राजकीय इनिंग सुरू करणार