महाराष्ट्र

‘या’ कारणांमुळे बस प्रवाशांमध्ये नाराजी!

23 Aug :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाच महिन्यानंतर एसटी बस सुरु झाली. कुठल्याही कटकटी शिवाय प्रवास करणे शक्य झाल्याने प्रवाशी आनंदी झाले. मात्र हा आनंद अवघ्या दोनच दिवसात मावळला. त्याला कारणही तसेच आहे. प्रवाशी बसस्थानकात आला की, त्याला सक्तीने ॲन्टीजेन टेस्ट करण्यास भाग पाडले जात असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी पसरली आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

कोरोनामुळे एसटी बस सेवा बंद होती. गुरुवारी (ता.वीस) पासून एसटी बससेवा सुरू झाली आहे.आता केवळ २२ प्रवासी घेऊनच एसटी धावणार आहे. इतिहासात पहिल्यांदाच पाच महिने इतका प्रदीर्घ काळ एसटी बस बंद ठेवावी लागली आहे. लॉकडाउनमुळे एसटीला दररोज अंदाजे २२ कोटी रुपयांची आर्थिक झळ सोसावी लागली. या पाच महिन्यांत तब्बल अडीच हजार कोटींपेक्षा अधिक उत्पन्न बुडाले आहे.

हे वाचा :- आता केवळ ‘या’ लोकांच्याच होणार कोरोना चाचण्या!

एसटीचा एकत्रित संचित तोटा सहा हजार कोटींच्याही पुढे गेला आहे.आता एसटी बस सुरु झाल्याने एसटीचे अर्थचक्र पुन्हा फिरु लागले आहे. एसटीने प्रवास करताना ई-पास लागणार नाही किंवा वैद्यकीय प्रमाणपत्राची गरज राहणार नाही अशी भूमिका शासनाने जाहिर केल्यामुळे प्रवाशी वर्ग सुखावला होता. प्रवाशी एसटीकडे वळत असतानाच सक्तीच्या ॲन्टीजन टेस्टमुळे पुन्हा नाराजी पसरली आहे.

हे वाचा :- राहुल गांधीनी अध्यक्षपद नाकारल्यास कोण सांभाळणार काँग्रेसची धुरा?

ॲन्टीजन टेस्टची मोठी धास्ती निर्माण झाली आहे. एसटीचा प्रवाशी वर्ग वाढत असतानाच मध्यवर्ती बसस्थानकात आणि सिडको बसस्थानकात येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची ॲन्टीजेन टेस्ट सुरु करण्यात आली आहे. दोन्ही बसस्थानकावर मनपाचे पथक तळ ठोकून आहेत. शहरात येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची टेस्ट करण्यात येत असल्याने प्रवाशी वर्गात नाराजी व्यक्त केली जात आहे.

हे वाचा :- मोठी बातमी! रोशन सिंग सोढीचा अलविदा…