राहुल गांधीनी अध्यक्षपद नाकारल्यास कोण सांभाळणार काँग्रेसची धुरा?
23 Aug :- सोनिया गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यास अध्यक्षपदाची जबाबदारी पुढे कोण घेणार असा प्रश्न आता काँग्रेस कार्यकर्त्यांना पडला आहे. याबद्दल पक्षात दोन मते आहेत. काँग्रेस कार्यकारी समितीचे सदस्य अध्यक्षपदाची निवड करतील किंवा ब्लॉक स्तरावरुन प्रत्येकाचं मत विचारात घेतलं जाईल.
दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!
काँग्रेसचा अध्यक्ष हे गांधी कुटूंब सोडून इतर कोणी असले पाहिजे, असे राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी आधीच सांगितले आहे. पण राहुल गांधींनी पुढे येऊन पक्षाची जबाबदारी सांभाळावी, असे पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते वारंवार बोलत आहेत.पण राहुल गांधींनी पक्षाचे नेतृत्व सांभाळले नाही तर केवळ सोनिया गांधींनी पक्षाचे नेतृत्व केले पाहिजे, असं देखील नेत्यांचं म्हणणं आहे.सोनिया गांधी या काँग्रेसचे अंतरिम अध्यक्षपद सोडण्याचा विचार करीत आहेत.
हे वाचा :- आता केवळ ‘या’ लोकांच्याच होणार कोरोना चाचण्या!
काँग्रेसमध्ये बर्याच दिवसांपासून पूर्णवेळ अध्यक्ष असावा अशी मागणी होत आहे. सोनिया गांधी यांनी अंतरिम अध्यक्षपदाचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला आहे.उद्या काँग्रेस वर्किंग कमिटीची (सीडब्ल्यूसी) बैठक होणार आहे.
हे वाचा :- सोनिया गांधी देणार राजीनामा;अध्यक्षपदासाठी ‘हा’ व्यक्ती प्रबळ दावेदार!
सूत्रांच्या माहितीनुसार, ही बैठक संघटनात्मक मुद्द्यांवर चर्चेसाठी बोलावण्यात आली आहे. पण उद्या सोनिया गांधी राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त करतील आणि सभासदांना कोणाला अध्यक्ष करावे यासाठी विचारणा करतील. अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण होणार याबाबत आता चर्चा सुरु झाल्या आहेत.
हे वाचा :- पंकजा मुंडेंची मोठी घोषणा, नव्याने राजकीय इनिंग सुरू करणार