मोठा धक्का! मुंबई इंडियन्सचा ‘हा’ स्टार गोलंदाज नाही खेळणार…
23 Aug :- यंदा आयपीएलचा तेरावा हंगाम दुबई, अबुधाबी आणि शारजाहला होणार आहे. 19 सप्टेंबरला पहिला सामना होणार असून 10 नोव्हेंबर रोजी अंतिम सामना खेळला जाणार आहे. या स्पर्धेत एकूण 10 डबल हेडर्स सामने असणार आहे.आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी जवळजवळ सर्वच संघाचे खेळाडू दुबईला पोहचले आहे.
दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मासह भारतीय खेळाडू एकत्र दुबईला पोहचले तर, विदेशी खेळाडू आपल्या देशातून थेट दुबईला पोहचणार आहेत. मात्र मुंबई इंडियन्सचा एक स्टार गोलंदाज युएइ येणार नाही आहे.मुंबई इंडियन्सचा आघाडीचा गोलंदाज लसिथ मलिंगासुरुवातीचे काही सामने खेळू शकणार नाही आहे. एसपीएनक्रिकएन्फोनं दिलेल्या वृत्तानुसार मलिंगाच्या वडिलांची तब्येत ठिक नसल्यामुळे तो सुरुवातीचे काही सामने खेळणार नाही आहे.
हे वाचा :- मोठी बातमी! रोशन सिंग सोढीचा अलविदा…
ऑक्टोबरमध्ये मलिंगा मुंबई इंडियन्स संघात सामिल होऊ शकतो. त्यामुळे मुंबई संघासाठी हा मोठा झटका असणार आहे. कारण, मुंबई संघासाठी मलिंगा महत्त्वाचा गोलंदाज आहे.गेल्या वर्षी झालेल्या अंतिम सामन्यात शेवटच्या ओव्हरमध्ये मलिंगाने सामना फिरवला आणि चेन्नईच्या तोंडचा घास पळवत मुंबईला विजय मिळवून दिला. त्यामुळे यंदा मलिंगाचे यॉर्कर मुंबईचे चाहते मिस करतील.
हे वाचा :- सोनिया गांधी देणार राजीनामा;अध्यक्षपदासाठी ‘हा’ व्यक्ती प्रबळ दावेदार!