राजकारण

सोनिया गांधी देणार राजीनामा;अध्यक्षपदासाठी ‘हा’ व्यक्ती प्रबळ दावेदार!

23 Aug :- सोनिया गांधी यांच्या हंगामी अध्यक्षपदाला एक वर्षे पूर्ण झालंय.दरम्यान, सोनिया गांधी राजीनामा देणार असल्याच्या चर्चा आहेत. पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांनीच पक्षाच्या अवस्थेबद्दल जागृत करणारं पत्र सोनिया गांधींना लिहिण्याचं धाडस दाखवलं आहे.भाजपचा वाढता विस्तार आणि युवकांनी मोदींना दिलेली साथ या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचा जनाधार कमी होत असून तातडीनं तळापासून मोठ्या बदलांची आवश्यकता असल्याचं या पत्रात म्हटलं आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काँग्रेस पक्षाला नवीन प्रमुखाची निवड करण्याची विनंती केली आहे. सांगितले जात आहे की सोनिया गांधींनी हे स्पष्ट केलं आहे की त्या यापुढे काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षपदावर राहणार नाहीत.सोनिया गांधी यांनी 2019 च्या निवडणुकीत अपयश मिळाल्यानंतर तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस पक्षाचा हंगामी अध्यक्षपद स्वीकारले होते.

हे वाचा :- पंकजा मुंडेंची मोठी घोषणा, नव्याने राजकीय इनिंग सुरू करणार

सोमवारी होणाऱ्या काँग्रेस वर्किंग समितीच्या बैठकीत हंगामी अध्यक्ष नियुक्त केल्याचे सांगितले जात आहे. कारण सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नव्या अध्यक्षाची नियुक्ती काँग्रेसच्या अंतर्गत निवडणुकीनंतरच केली जाऊ शकते.सोमवारी होणाऱ्या काँग्रेस वर्किंग समितीच्या बैठकीत राहुल गांधी यांना काँग्रेसचा हंगामी अध्यक्ष नियुक्त करण्याची शक्यता आहे.काँग्रेस अध्यक्षपद करिता राहुल गांधी प्रबळ दावेदार असल्याचे म्हटले जात आहे.

हे वाचा :- मोठी बातमी! रोशन सिंग सोढीचा अलविदा…