सिनेमा,मनोरंजन

मोठी बातमी! रोशन सिंग सोढीचा अलविदा…

23 Aug :- लहाना पासून थोरांपर्यंत,घरा-घरामध्ये दिवसभर पाहण्यात येणारी,भारतामधील लोकप्रिय आणि पोटभरून हसवणारी विनोदी मालिका ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ मधील मुख्य भूमिका साकरणारा अभिनेता रोशन सिंग सोढी उर्फ गुरुचरण सिंग सोढीने तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेला अलविदा केला आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

काही दिवसांपूर्वीच तारक मेहताची पत्नी अंजली मेहताची भूमिका करणारी अभिनेत्री नेहा मेहताने मालिकेला अलविदा केला आहे.यानंतर लागलीच रोशन सिंग सोढी उर्फ गुरुचरण सिंग सोढीने या मालिकेतून एक्सिट घेतल्याने तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

हे वाचा :- मोठा धक्का! इथून पुढे नाही दिसणार अंजली भाभी…

रोशन सिंग सोढीच्या जागी बलविंदर सिंगला घेण्यात आले असून नव्या कलाकारांसह शूटिंग देखील सुरू झाले आहे, असे वृत्त ‘स्पॉटबॉय’ने दिले आहे. दरम्यान, गुरुचरण सिंग सोढीने वडिलांच्या तब्येतीचे कारण देऊन हा शो सोडला आहे.

हे वाचा :- मोठा दिलासा;वीज बिलात मिळणार एवढी सूट!

गुरुचरण सिंग सोढीने ‘दिल तो पागल है’ या चित्रपटात शाहरुख खान यांच्यासोबत काम केले आहे. यात त्याने शाहरुखच्या मित्राची भूमिका निभावली होती. तसेच ‘धमाल’, ‘साजन चले ससुराल’ आणि ‘वो लोफर’ यासारख्या चित्रपटात फेखील तो झळकला आहे.

हे वाचा :- रशियाला व्हॅक्सीन निर्मितीसाठी हवी आहे भारताची मदत!

या मालिकेतील नटखट टप्पूने सुद्धा काही दिवसांपूर्वी मालिकेला अलविदा केला.यानंतर डॉ.हंसराज हाथीची भूमिका साकारणारे कवि कुमार आजाद यांचा निधन झाले.सर्वांना पोट धरून हसवणारी या मालिकेतील मुख्य अभिनेत्री दया सध्या मालिकामध्ये काही कारणास्तव दिसत नाही.या मालिकेतून सोनू नावाचं पात्र सुद्धा अनेकदा बदलले आहे. तारक मेहता का उलटा चष्मा या लोकप्रिय,विनोदी मालिकेचा मुख्य आधारस्तंभ असलेल्या कलाकारांनी अचानक या मालिकेला अलविदा केल्याने या मालिकेचं विशेष आकर्षण काय राहणार हा प्रश्न आता चाहत्यां समोर उभा राहिला आहे.

हे वाचा :- धक्कादायक! मृत्यूपूर्वी सलग तीन दिवस सुशांतने ओढला होता गांजा