संतापजनक! नवऱ्यासह 143 लोकांनी केला 25 वर्षीय महिलेवर बलात्कार…
22 Aug :- हैदराबादमधून माणुसकीस कलंक लावनारी आणि लाज आणणारे घृणास्पद प्रकरण समोर आले आहे. शहरातील पंजागुट्टा पोलिस ठाण्यात एका महिलेने तक्रार दाखल केली आहे की, तिच्यावर 143 जणांनी बलात्कार केला. या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिलेने (वय 25) गुरुवारी तक्रार दिली आहे, परंतु याबाबतचा खुलासा शुक्रवारी करण्यात आला आहे.त्यासोबतच महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे आणि या तक्रारीत तिने आपल्यासोबत घडलेल्या सर्व घटनांचा उल्लेख केला असल्याचेही सांगण्यात आले आहे. या 11 वर्षात आतापर्यंत तिच्यावर 5000 वेळा बलात्कार झाल्याचेही या महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. याशिवाय या महिलेने 138 पुरुषांची नावेही लिहिली असून तिने 5 लोकांना ओळखत नसल्याचे लिहिले आहे. असेही म्हटले जात आहे की, जगातील ईतक्या लोकांवर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याची ही पहिली घटना आहे. या संदर्भात पंजागुट्टा पोलिस स्टेशनचे निरीक्षक निरंजन रेड्डी यांनी सांगितले की, नलगोंडा जिल्ह्यातील रहिवासी महिलेचे २००९ मध्ये लहान वयातच लग्न झाले होते. ते पुढे म्हणाले की, लग्नाच्या सहा महिन्यांतच या महिलेचा घटस्फोट झाला. कारण की नवऱ्यासह घरातील सर्व पुरुषांद्वारे बलात्कार करण्यास सुरुवात केली. या महिलेने 2010 पासून पतीपासून घटस्फोट घेतला आणि आपल्या माहेरी गेली. त्यानंतर तिचा सुमन नावाच्या व्यक्तीने विश्वासघात केला आणि त्यानंतर ती हैदराबादला राहायला गेली. ती हैदराबादमध्ये भटकत राहिली आणि अनेक लोकांनी तिच्यावर बलात्कार केला. आता तिने दाखल केलेल्या तक्रारीत या महिलेने म्हटले आहे की बलात्कार करणार्यांमध्ये नेते, अभिनेते आणि प्रमुख व्यक्ती आहेत. यासह त्यांनी दिलेल्या तक्रारीत अनेक खळबळजनक घटनाही सांगितल्या आहेत.