हिटमॅनसह पाच खेळाडूंना खेळरत्न पुरस्कार जाहीर!
22 Aug :- क्रिडा मंत्रालयाने शुक्रवारी पाच खेळाडूंना राजीव गांधी खेळरत्न पुरस्कार जाहीर केला आहे. यात क्रिकेटर रोहित शर्मा (क्रिकेट), मरियप्पन टी (पॅरा एथलीट), मनिका बत्रा (टेबल टेनिस), विनेश फोगाट (रेसलिंग) आणि रानी रामपाल (महिला हॉकी) सामील आहेत.
दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!
देशातील सर्वात मोठा क्रिडा पुरस्कार मिळणारा रोहित शर्मा देशातील चौथा क्रिकेटर आहे. याआधी सचिन तेंडुलकर, महेंद्र सिंह धोनी आणि विराट कोहलीला हा पुरस्कार मिळाला आहे.
हे वाचा :- माहीची झाली कोरोना टेस्ट;भज्जीला चेन्नई संघासोबत नाही जात येणार!
सचिन तेंडुलकर पहिला भारतीय क्रिकेटर होता, ज्याला 1998 मध्ये खेळरत्न पुरस्कार मिळाला होता. धोनीला 2007 आणि कोहलीला 2018 मध्ये पुरस्कार मिळाला होता. यापूर्वी 2016 मध्ये बॅडमिंटन खेळाडून पीवी सिंधु, जिमनास्ट दीपा कर्माकर, रेसलर साक्षी मलिक आणि शूटर जीतू रायला दिला होता.कोरोनामुळे पहिल्यांदा राष्ट्रीय क्रिडा पुरस्कार 29 ऑगस्टला व्हर्चुअली दिले जातील. दरवर्षी 29 ऑगस्टला नॅशनल स्पोर्ट्स-डे दिवशी राष्ट्रपती भवनात मोठा सोहळा आयोजित करुन पुरस्कार दिला जातो.