भारत

रशियाला व्हॅक्सीन निर्मितीसाठी हवी आहे भारताची मदत!

22 Aug :- अवघ्या जगभरातील मानव जातील आपल्या तालावर नाचवणारा कोरोना विषाणूला थोपवण्यासाठी रशिया या देशाने पहिल्या कोरोना प्रभावी कोरोना लशीचा शोध लावला आहे. आता या कोरोना व्हॅक्सीनचे मोठ्या प्रमाणावर प्रोडक्शन करण्यासाठी रशियाला भारताची मदत हवीये. रशियाचे म्हणने आहे की, भारतासोबत पार्टनरशिपमध्ये या व्हॅक्सीनचे उत्पादन केल्यास, जगभरात असलेली व्हॅक्सीनची मागणी लवकर पूर्ण करता येईल.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

गुरुवारी रशियन डाइरेक्ट इंवेस्टमेंट फंड (आरडीआयएफ) चे सीईओ किरिल मित्रेवने याबाबत माहिती दिली. रशियाने तयार केलेली ‘स्पुतनिक वी’ नावाची कोरोना व्हॅक्सीन रशियातील गामालेया रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ एपिडेमियोलॉजी अँड मायक्रोबॉयोलॉजीने आरडीआयएफसोबत मिळून तयार केली आहे. या व्हॅक्सीनचे फेज-3 म्हणजेच, मोठ्या स्तरावर क्लिनिकल ट्रायल करण्यात आलेले नाही.मित्रेवने एका ऑनलाइन प्रेस ब्रीफिंगदरम्यान म्हटले की, अनेक देशांनी व्हॅक्सीनचे मागणी केली आहे.

हे वाचा :- खळबळजनक! सासू आणि पत्नीला फेकले छतावरून…

ही मागणी पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्याची गरज आहे. औषध निर्माणाच्या बाबतीत भारत अग्रेसर आहे. आम्हाला विश्वास आहे की, भारत मोठ्या प्रमाणावर औषधाचे उत्पादन करू शकेल आणि यासाठी आम्हाला भारताची मदत हवीये.मित्रेव पुढे म्हणाले की, व्हॅक्सीन उत्पादनादरम्यान रिसर्च आणि अॅनालिसिसदरम्यान आढळले की, भारत, ब्राझील, साउथ कोरिया आणि क्यूबासारख्या देशांमध्ये उत्पादनाची चांगली क्षमता आहे. त्यामुळे आम्ही इच्छा आहे की, यापैकी कोण्या एका देशात स्पुतनिक तयार करण्याचे मोठे सेंटर तयार व्हावे.आतापर्यंत 10 लाखांपेक्षा जास्त व्हॅक्सीनचे मागणी आहे.

हे वाचा :- राज्यातील ८० टक्के लोकांना करोनाचे लक्षणे नाहीत- उद्धव ठाकरे

भारताकडे दरवर्षी 5 कोटींपेक्षा जास्त डोज तयार करण्याची क्षमता आहे. त्यामुळे भारतासोबतची भागीदारी चांगली सिद्ध होईल. यासाठी आम्ही भारतातील ड्रग मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांसोबत संपर्क करत आहोत. आम्हा फक्त रशियाच नाही, तर यूएई, सौदी अरब, ब्राझील आणि भारतात क्लिनिकल ट्रायल करणार आहोत. आम्हा पाचपेक्षा जास्त देशात व्हॅक्सीनेच उत्पादन करण्याच्या विचारात आहोत. आम्हाला आशिया, लॅटिन अमेरिका, इटली आणि इतर देशातून लसीची मागणी आहे.

हे वाचा :- शरद पवारांचे निवासस्थान कोरोनाच्या घेऱ्यात