बीड

कोरोनाचे आज द्विशतक; 233 रुग्ण पॉझिटिव्ह!

बीड जिल्ह्यात कोरोना विषाणूचाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढत आहे.बीड जिल्हयातील सहा शहरांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे.मात्र कोरोना रुग्णवाढीत दिवसेंदिवस भर पडतच आहे.जिल्ह्यातील प्रत्येक शहरामध्ये,गावामध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

कोरोना विषाणूच्या वाढत्या पसरावा मुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊ लागले आहे.आताच आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार अँटीजेन टेस्टमध्ये १७२ रुग्ण आढळले आहेत तर,थ्रोट स्वाब अहवालामध्ये ६१ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत.यामुळे आज एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २३३ झाली आहे.

हे वाचा:- बीड न प चे माजी सभापती प्रभाकरराव काळे यांचे दुःखद निधन