महाराष्ट्र

‘त्याने’ भर रस्त्यात घेतलं स्वतःला पेटवून!

५५ वर्षीय व्यक्तीने टपरीच्या वादावरून स्वतःला पेटवून घेतले!

21 Aug :- एकीकडे सामान्य माणसांचे आयुष्य दिवसेंदिवस कोरोनामुळे विस्कळीत होत आहे.आणि दुसरीकडे समाजात घडणाऱ्या खळबळजनक आणि संतापजनक घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे.शहरातील खडकपुरा भागात विजय कमळे पाटील या 55 वर्षीय व्यक्तीने टपरीच्या वादातून भरदिवसा स्वत:ला भर रस्त्यात पेटवून घेतलं आहे.घटनेत इसम गंभीररीत्या भाजला. जखमी व्यक्तीची प्रकृती अत्यावस्थ आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

विशवनाथ उत्तमराव जाधव असं 55 वर्षीय जखमी इसमाचं नाव असून शहरातील अलंकार चौकाजवळील खडकपुऱ्यातील एका छोट्याश्या टपरीच्या ढोल,तबला सारख्या वाद्यांची दुरुस्ती करून तो आपला उदरनिर्वाह चालवत होता.काही दिवसांपूर्वी रस्ता निर्मितीसाठी सदर व्यक्तीची टपरी हटवण्यात आली होती.दरम्यान, सदर टपरी परत त्या जागेवर ठेवण्यास शेजारी राहणाऱ्या कुटुंबाकडून विरोध करण्यात येत होता.

हे वाचा :- राज्यातील ८० टक्के लोकांना करोनाचे लक्षणे नाहीत- उद्धव ठाकरे

शेजाऱ्यांनी त्याच्या टपरीच्या जागेवर एक कार आणून उभी केली होती. याच टपरीच्या वादातून विशवनाथ जाधव याने स्वतःला पेटवून घेतले.या घटनेत विशवनाथ गंभीररीत्या भाजला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. घटनेनंतर संतप्त जमावाने त्या कारची तोडफोड केली. घटनास्थळी तणावपूर्ण स्थिती निर्माण झाल्याने पोलिसांचा मोठा फोजफाटा तैनात करण्यात आला होता.

हे वाचा :- भारतातील कोरोना लशीबाबत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली गूड न्यूज