महाराष्ट्र

महाराष्ट्राचे ‘धक्कादायक’ कोरोना अपडेट!

21 Aug :- राज्यात कोरोना विषाणूचा वाढता पसराव प्रशासन आणि नागरिकांची डोकेदुखी वाढवत आहे.कोरोनमुक्त होणाऱ्यांची वाढती आकडेवारी दिलासादायक आली तरी दररोज कोरोनाबाधित रुग्णांची वाढती आकडेवारी चिंताजनक होत चालली आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

कोरोना विषाणूचा वाढत कहर सर्व सामान्य माणसांचे दैनंदिन जीवन विस्कळीत करून टाकत आहे. आज राज्यामध्ये कोरोना रुग्णवाढीची धक्कादायक विक्रमी नोंद झाली आहे.राज्यात शुक्रवारी 14 हजार 161 नवे रुग्ण सापडले. दिवसभरात 339 जणांचा मृत्यू झाला. तर 11 हजार 749 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 71.39 टक्के आहे. तर राज्यात 1 लाख 65 हजर 162 Active रुग्ण आहेत.

हे वाचा:- देशद्रोही चित्रपट बनवणाऱ्या करणचा पद्मश्री काढून घ्यावा-कंगना

राज्यात आतापर्यंत करोनाबधितांची संख्या 6 लाख 57 हजार 450 एवढी झालीय. तर ठाणे महापालिका क्षेत्रात 183 कोरोणा पॉझीटिव्ह रुग्णांची नोंद झाली.20 दिवसांत जवळपास देशात 62 ते 69 हजार नवीन रुग्णांची नोंद करण्यात येत होती मात्र एका दिवसांत सर्वात जास्त रुग्ण बरे झाले आहेत. शुक्रवारपर्यंत 24 तासांत 62 हजारहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत.

हे वाचा:- ‘या’ कारणामुळे मुख्यमंत्र्यांची वाढली डोकेदुखी

देशात आतापर्यंत कोरोनातून रुग्ण बरे होण्याचा दर 74.30 टक्के आहे.केंद्रीय आरोग्य मंत्र्यानं दिलेल्या नवीन आकडेवारीनुसार देशात 68 हजार 898 नवीन लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. 24 तासांत 983 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत देशात कोरोनाग्रस्थांची संख्या 29 लाखावर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 54 हजार 849 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

हे वाचा :- खळबळजनक! सासू आणि पत्नीला फेकले छतावरून…