‘या’ कारणामुळे मुख्यमंत्र्यांची वाढली डोकेदुखी
21 Aug :- जालन्यातील काँग्रेस आमदार कैलास गोरंटयाल यांनी राज्य सरकारकडून काँग्रेसच्या 11 आमदारांवर अन्याय केला जात असल्याचा आरोप केला आहे.आमदार कैलास गोरंटयाल यांनी नगरविकास खात्याकडून काँग्रेस आमदारांच्या ताब्यात असलेल्या नगरपालिकांना निधी देण्यात भेदभाव करण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली आहे.
दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!
पालिकेला नक्कीच निधी मिळेल अशी अपेक्षा काँग्रेसचे जालन्याचे आमदार कैलास गोरंटयाल यांनी व्यक्त केली.गोरंटयाल यांनी जिल्ह्यातील काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या 4 पालिकांचा रद्द करण्यात आलेला निधी पुन्हा मिळावा अशी मागणी केली आहे.
हे वाचा:- शरद पवारांचे निवासस्थान कोरोनाच्या घेऱ्यात
हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेता सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आणि कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांचं नाव आल्याने ठाकरे सरकारवर संकट आले आहे. त्यातच सत्तेत सामील असलेल्या काँग्रेस आमदारानेही जाहीरपणे सरकारकडून भेदभाव केला जात असल्याचा आरोप केल्याने उद्धव ठाकरे यांची डोकेदुखी वाढली आहे.
हे वाचा:- भारतातील कोरोना लशीबाबत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली गूड न्यूजhttp://शिक्षणमंत्र्यांचा मोठा निर्णय; शाळा सुरू होणार!