खळबळजनक! सासू आणि पत्नीला फेकले छतावरून…
21 Aug :- एकीकडे कोरोना विषाणूचा कहर आणि दुसरीकडे समाजात घडणाऱ्या खळबळजनक आणि धक्कादायक घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण होत आहे.
उत्तर प्रदेशातील कन्नौज दुहेरी हत्याकांडाने हादरले. एका तरुणाने आपल्या पत्नीसह घरी आलेल्या सासूची निर्घृण हत्या केली.कन्नौजमधील हौदापुर्वा गावात ही खळबळजनक घटना घडली. गावातील पवन उर्फ मुरारी याने शुक्रवारी सकाळी आपली पत्नी आणि घरी राहायला आलेल्या सासूची निर्घृण हत्या केली. हत्या केल्यानंतर तो पोलीस ठाण्यात गेला आणि त्याने पत्नी आणि सासूची हत्या केल्याची कबुली दिली.
दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!
पत्नीसोबत वाद झाला होता. त्यावेळी सासूने रोखले. त्यामुळे रागाच्या भरात त्या दोघींची हत्या केली, असे त्याने पोलिसांना सांगितले.सासू कलावती ही कानपूरला राहत होती. ती मुलीच्या घरी आली होती. पत्नी सवितासोबत पवनचे भांडण झाले. त्याचवेळी सासूने रोखले. रागाने दोघींना मारहाण केली. त्यानंतर दोघींना छतावरून खाली फेकून दिले. दोघींचा जागीच मृत्यू झाला.
हे वाचा:- अहमदनगर हादरले; तुफान हाणामारीत ३ सख्ख्या भावांसह चौघांचा निर्घृण खून
घटना घडली त्याआधी पोलिसांत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली होती. मात्र पोलिसांनी दखल घेतली नाही, असा आरोप मृतांच्या कुटुंबीयांनी केला आहे. दुसरीकडे पोलिसांकडून हत्येशी संबंधित माहिती घेतली जात आहे. तसेच वेगवेगळ्या दिशेने तपास केला जात आहे. दोघींचे मृतदेह विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. आजूबाजूच्या लोकांकडे चौकशी केली जात आहे. या दुहेरी हत्याकांडानंतर परिसरात दहशत निर्माण झाली आहे.
हे वाचा:- कोरोना संकटात उर्मिला आली धावून;वाचा राज्य सरकाला किती लाखांची केली मदत !