शरद पवारांचे निवासस्थान कोरोनाच्या घेऱ्यात
21 Aug :- राज्यात सर्वत्र कोरोना विषाणूचा कहर सुरु आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये,शहरांमध्ये,गावा-गावांमध्ये सर्वत्र कोरोना विषाणूचा पसरावं झाला आहे. सर्व सामान्यांसह अनेक मोठे सेलिब्रेटी,राजकीय नेते,अभिनेते,खेळाडू यांना देखील सुरक्षित स्थळी असताना सुद्धा कोरोनाने आपल्या चपेटीत धरले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी देखील कोरोनाचा शिरकाव झाल्याची धक्कादाय माहिती समोर आली आहे.
दै.झुंजारनेताच प्रत्येक लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!
बारामतीतील पवार यांच्या गोविंदबाग निवासस्थानातील चार कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.मुंबईत सिल्व्हर ओक येथे करोनाचे १६ रुग्ण आढळल्यानंतर शरद पवार यांच्या बारामतीतील गोविंद बाग निवासस्थानातील ५० कर्मचाऱ्यांची करोना चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी ४ जणांना करोनाची लागण झाल्याचं आढळून आलं आहे.
हे वाचा:- भारतातील कोरोना लशीबाबत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली गूड न्यूज
करोनाची लागण झालेले चारही कर्मचारी पवारांच्या शेतात आणि बागेत काम करणारी आहेत. या चौघांना करोनाची लागण झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या चारही जणांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येत असून त्यांच्या संपर्कातील इतर लोकांचीही करोना चाचणी करण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. बारामतीतही करोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. बारामतीत आतापर्यंत ४७३ करोना रुग्ण सापडले आहेत.
हे वाचा:- शैक्षणिक वर्ष सुरु करण्याबाद विचारविनिमय सुरु- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे