सिनेमा,मनोरंजन

मोठा धक्का! इथून पुढे नाही दिसणार अंजली भाभी…

 21 Aug :- लहाना पासून थोरांपर्यंत,घरा-घरामध्ये दिवसभर पाहण्यात येणारी,भारतामधील लोकप्रिय आणि पोटभरून हसवणारी विनोदी मालिका 'तारक मेहता का उलटा चष्मा' मधील मुख्य देखणी अभिनेत्री अंजली मेहता इथून पुढे मालिकांमध्ये काम करणार नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

अंजली मेहता या कार्यक्रमात सुरवातीपासून 12 वर्ष तारक मेहताची पत्नी अंजली मेहताची भूमिका करणारी अभिनेत्री नेहा मेहताने मालिकेला अलविदा केले आहे. गेल्या काही दिवसांपासून मीडियामध्ये यामध्ये चर्चा सुरू होती. नेहा लवकरच या मालिकेमध्ये काम करताना दिसणार नाही आहे, यामुळे ‘तारक मेहता…’च्या चाहत्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे.या अहवालात असे नमूद करण्यात आले आहे की, गेली अनेक वर्ष ‘अंजली भाभी’च्या रुपात चाहत्यांचे मनोरंजन करणाऱ्या नेहा मेहताने या कार्यक्रमाला अलविदा केले आहे. म्हणजेच नेहा आता या मालिकेचा घटक नसणार आहे.

दै.झुंजारनेताच प्रत्येक लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी लिंक वर प्रेस करा

नेहाने मालिकेच्या निर्मात्यांना याबाबत सूचना दिली असून तिने सेटवर रिपोर्ट करणे देखील बंद केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार मालिके्या निर्मात्यांनी नेहाला समजवण्याचा प्रयत्न केला मात्र ती तिच्या निर्णयावर ठाम आहे.अशी बातमी समोर येत आहे की, नेहाला नवीन प्रोजेक्ट मिळाला आहे. ज्यामुळे तिने 12 वर्ष ज्या मालिकेचा ती अविभाज्य घटक होती, त्या मालिकेला अलविदा केले आहे.

हे वाचा:- भारतातील कोरोना लशीबाबत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली गूड न्यूज

गेल्या महिन्यात 28 जुलै रोजी ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेला 12 वर्ष पूर्ण झाली होती.नेहा मेहता सुरुवातीपासून या मालिकेमध्ये आहे. दरम्यान आता नेहाची जागा कोण घेणार याबाबत कोणती माहिती समोर आली नाही आहे.’तारक मेहता…’या मालिकेतील अंजली हा अनेकांचा आवडीचा चेहरा होता. मिळालेल्या माहितीनुसार नेहा या मालिकेच्या शूटिंगसाठी एका दिवसाचे 25 हजार रुपये मानधन घ्यायची. ती उत्तम डान्सर देखील आहे. नेहाने अशाप्रकारे शो सोडल्याने चाहत्यांमध्ये नाराजी आहे.

हे वाचा:- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पावलावर अक्षय कुमारचे पाऊल, पोस्ट शेअर करून दिली माहिती