Newsबीड

बीड न प चे माजी सभापती प्रभाकरराव काळे यांचे दुःखद निधन

शहरातील काळे गल्ली येथील नगरपालिकेचे माजी सभापती प्रभाकर नारायणराव काळे 74 यांचे औरंगाबाद येथे उपचार सुरू असताना दुःखद निधन झाले आहे

स्वर्गीय केशरकाकू क्षीरसागर यांचे कट्टर समर्थक असलेले बीड नगरपालिकेचे माजी सभापती प्रभाकर राव काळे हे गेल्या काही दिवसापासून आजारी होते त्यांच्यावर औरंगाबाद येथे रुग्णालयात उपचार सुरू होते स्वर्गीय केशरकाकू क्षीरसागर यांच्या कार्यकाळात पासून काळे कुटुंब राजकारणाची जोडले गेलेले आहे नारायणराव काळे हे बीड नगरपालिकेचे पहिले उपाध्यक्ष होते.

त्यानंतर प्रभाकर राव काळे हे देखील नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर सभापती म्हणून त्यांनी काम केले आहे काळे कुटुंबीय क्षीरसागर घराण्याशी जोडले गेलेले आहे किशोर काळे अंजली काळे जगदीश काळे राजेंद्र काळे आणि आता सौ सविता काळे हे नगरसेवक म्हणून आतापर्यंत राजकारणात कायम राहिलेल्या आहेत प्रभाकर दादा काळे अत्यंत मनमिळावू आणि तेवढ्याच कडक शिस्तीचे म्हणुन ओळखले जात होते आदरयुक्त असा त्यांचा स्वभाव होता गेल्या काही दिवसापासून त्यांना निमोनिया आजाराने ग्रासले होते औरंगाबाद येथे उपचार सुरू असताना आज शुक्रवारी सकाळी त्यांचे दुखद निधन झाले त्यांच्या निधनामुळे बीड शहरात आणि त्यांच्या प्रभागात हळहळ व्यक्त केली जात आहे