राजकारण

‘या’ नेत्याने केली मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी!

21 Aug :- सुशांतसिंह राजपूत प्रकरण सीबीआयकडे देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर भाजप आक्रमक झाली आहे. भाजपा नेत्यांनी सर्वेाच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्य सरकारला धारेवर धरलं आहे. भाजप नेते निलेश राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राजीनामा देण्याची मागणी केली आहे.गेल्या तीन महिन्यांपासून सुशांतसिंह प्रकरणावरून देशभरात राजकीय गदारोळ सुरू आहे.

दै.झुंजारनेताच प्रत्येक लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी लिंक वर प्रेस करा

या प्रकरणाशी ठाकरे सरकारमधील मंत्र्यांचा संबंध असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत होता. तसंच, मुंबई पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करून हा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी केली होती. त्यामुळं राज्य सरकार कोणालातरी वाचवण्यासाठी सीबीआयकडे हे प्रकरण सोपावण्यास तयार होत नसल्याचा टीका सातत्यानं विरोधकांकडून होत होती. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयानं हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचे निर्देश दिल्यानंतर भाजपनं ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

हे वाचा:- महाराष्ट्राचे कोरोना अपडेट!

‘राजीनामा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या मागितला पाहिजे. आंधळा आणि बहिरा पण सांगेल की मुंबई पोलिसांवर मागच्या ६५ दिवसांत कोण दबाव टाकत होतं. एवढा दबाव फक्त मुख्यमंत्री कार्यालय टाकू शकतं म्हणून राजीनामा पण मुख्यमंत्र्यांनीच दिला पाहिजे,’ असं ट्विट भाजप नेते निलेश राणे यांनी केलं आहे.दरम्यान, किरीट सोमय्या यांनीही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली होती.

हे वाचा: महाराष्ट्रासाठी शरमेची घटना, औरंगाबादच्या MGM रुग्णालयात महिला डॉक्टरासोबत धक्कादायक प्रकार

मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी सुशांत प्रकरणात तब्बल दोन महिने साधा एफआयआर नोंदवून न घेणं हे दुर्दैवी आहे. ह्याची जबाबदारी घेऊन महाराष्ट्रचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा. सुशांतच्या कुटुंबालाचा गुन्हेगार ठरवण्याचा प्रयत्न केला गेला. ठाकरे सरकारची दादागिरी आता संपेल. हे सरकार आतातरी धडा घेईल,’ असं सांगतानाच, ‘सुशांतसिंहच्या कुटुंबाला न्याय मिळेल,’ असा विश्वासही सोमय्या यांनी व्यक्त केला आहे.

हे वाचा:- सचिन 2 लाख रुपयांना असणाऱ्या ‘त्या’ गाडीच्या प्रेमात!