सिनेमा,मनोरंजन

कोरोना संकटात उर्मिला आली धावून;वाचा राज्य सरकाला किती लाखांची केली मदत !

21 Aug :- महाराष्ट्र राज्याने आजवर मोठ्या मोठ्या संकटाशी दोन हात केले आहेत. सध्या महाराष्ट्रावर कोरोनारूपी असलेले मोठे संकट थोपवण्यासाठी राज्यातील आरोग्य यंत्रणा दिवसरात्र कष्ट घेत आहे.कोरोनाशी लढण्याकरिता महाराष्ट्रातील अनेक मोठ्या मनाच्या दानशूरांनी आपल्या खिशातून महाराष्ट्र सरकारला आर्थिक मदत करून मोठा मदतीचा हात दिला आहे. किती लाखांची केली मदत

दै.झुंजारनेताच प्रत्येक लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी लिंक वर प्रेस करा

या मदतीच्या यादीमध्ये आता नवे नाव समोर आले आहे.हिंदी चित्रपट सृष्टीतील (bollywod) लोकप्रिय असणारी एका काळची आघाडीची,देखणी, मराठमोळी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (urmila motondkr) कोरोना काळात वेळप्रसंगी राज्य सरकारला २० लाख रुपयांची राशी देऊन मोठी मदत केली आहे.एवढंच नाही तर कलाकारांनी पुढे येऊन राज्य सरकारला मदत करण्याचं आवाहन देखील केलं आहे.राज्यात कोरोनाशी लढताना लागणारी साधनसामुग्री कोरोना योद्ध्यांचा खर्च यासाठी आर्थिक पाठबळ गरजेचं आहे. त्यासाठी मदत केल्याची भावना अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (urmila motondkr) यांनी व्यक्त केली आहे.

हे वाचा:- देशद्रोही चित्रपट बनवणाऱ्या करणचा पद्मश्री काढून घ्यावा-कंगना

महाराष्ट्राबद्दल आदर असल्यानं आपल्या लोकांसाठी काहीतरी करावं असं वाटतं. त्यामुळे ठाकरे सरकारला आर्थिक पाठबळ दिलं पाहिजे, या हेतूनं मातोंडकर यांनी मदत केली आहे.कोरोना तडाख्यामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. लाखो लोकांना कोरोना व्हायरसचा (covid-19)फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. प्रत्येक राज्यात व देशात विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.

हे वाचा:- …यामुळे माहीने घेतली ०७:२९ मिनिटांनी निवृत्ती!

डॉक्टर आणि रूग्णालयातील इतर सहकाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे जवळपास अनेक लोक कोरोनातून पूर्णपणे बरे होत आहे. योग्य ती काळजी आणि उपचार घेतल्यास हा आजार बरा होऊ शकतो, पण तेवढंच पाठबळ कोविड योद्ध्यांना देणं गरजेचं आहे. सुरुवातीला सर्वांचे हात पुढे आले. पण, हळूहळू पुर्वपदावर येत असताना सरकारसोबत तिकक्याच ताकदीनं पुढे यायला पाहिजे, असं मातोंडकर यांनी सांगितलं.

हे वाचा:- महाराष्ट्रासाठी शरमेची घटना, औरंगाबादच्या MGM रुग्णालयात महिला डॉक्टरासोबत धक्कादायक प्रकार