महाराष्ट्राचे कोरोना अपडेट!
20 Aug :- राज्यामध्ये कोरोना विषाणूचा उद्रेक दिवसेंदिवस वाढत आहे.कोरोना विषाणूच्या वाढत्या आकडेवारीमुळे सर्व सामान्य माणसांचे दैनंदिन जीवन विस्कळीत आणि उध्वस्त होऊ लागले आहे.कोरोना विषाणूचा पसराव गावामध्ये वाढत आहे.कोरोनमुक्त होणाऱ्यांची आकडेवारी सुखावणारी असली तरी
कोरोनाबाधितांची वाढती आकडेवारी आता प्रशासनाची आणि नागरिकांची डोकेदुखी वाढवत आहे. गुरुवारी पुन्हा एकदा उच्चांकी रुग्णवाढ झाली आहे. 14 हजारांवर नवे रुग्ण 24 तासांत दाखल झाले आहेत.त्यामुळे राज्याच्या कोरोनाच्या ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 1,62,491 एवढी झाली आहे. कुठल्याही दुसऱ्या राज्यात एवढ्या संख्येने उपचाराधीन कोरोनारुग्ण नाहीत.
दै.झुंजारनेताच प्रत्येक लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी लिंक वर प्रेस करा
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आंतरजिल्हा एसटी सेवा सुरू होत असतानाच ही विक्रमी रुग्णवाढ झाल्याने पुन्हा एकदा चिंता वाढली आहे.गेल्या 24 तासांत 14,492 नवे कोरोनारुग्ण राज्यात सापडले आहेत. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढत असलं, तरी रुग्णवाढीचा दर आणि हा विषाणू गावागावात पसरण्याचा वेग वाढला आहे.
हे वाचा:- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लिहले महेंद्रसिंग धोनीला पत्र, म्हणाले…
गेल्या 24 तासांत 12,243 रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत 4,59,124 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात आज 326 रुग्णांचा मृत्यू झाला असून राज्यातील मृत्यूदर 3.32 टक्के एवढा आहे.
हे वाचा:- महाराष्ट्रासाठी शरमेची घटना, औरंगाबादच्या MGM रुग्णालयात महिला डॉक्टरासोबत धक्कादायक प्रकार