क्रीडा

माहीची झाली कोरोना टेस्ट;भज्जीला चेन्नई संघासोबत नाही जात येणार!

दिल्ली कॅपिटल्स, राजस्थान रॉयल्स आणि किंग्स इलेवन पंजाबने दुबईच्या दिशेने उड्डाण केलं आहे. तर चेन्नई सुपरकिंग्सची टीम शुक्रवारी यूएई रवाना होणार आहे. चेन्नईची टीम उड्डाण करण्यापूर्वी मोठी बातमी समोर आली आहे. स्टार ऑफ स्पिनर टीमसोबत यूएईला जाणार नाहीत.

चेन्नई सुपरकिंग्ससोबत हरभजन सिंह का जाणार नाहीत? अधिकाऱ्यांनी सांगितले की हरभजन वैयक्तिक कारणांमुळे टीमसोबत यूएईला जाणार नाहीत. ते दोन आठवड्यांच्या आत टीममध्ये सहभागी होतील. हरभजन सिंहने चेन्नईत झालेल्या एका छोट्या कॅम्पमध्येही सहभागी झाले नाहीत.सांगितले जात आहे की, कॅम्पमध्ये महेंद्र सिंह धोनी, सुरेश रैना, दीपक चाहर, कर्ण शर्मा सारखे खेळाडू सहभागी झाले होते.

सचिन 2 लाख रुपयांना असणाऱ्या ‘त्या’ गाडीच्या प्रेमात!

चेन्नईचे स्टार ऑलराउंडर रवींद्र जडेजा आणि शार्दुल ठाकुरदेखील वैयक्तिक कारणांमुळे शिबिरात आले नाहीत. ठाकुर बुधवारी टीममध्ये सहभागी झाले. गुरुवारी सायंकाळपर्यंत टीममध्ये सहभागी होतील. बाकी खेळाडू 15 ऑगस्टपासून चेन्नईमध्ये बॉलिंगचे कोच लक्ष्मीपति बालाजी यांच्यासह अभ्यास करीत आहेत.

…यामुळे माहीने घेतली ०७:२९ मिनिटांनी निवृत्ती!

चेन्नई सुपरकिंग्सचे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी एमएस धोनी, सुरेश रैना समेत सर्व खेळाडूंची कोरोना चाचणी करण्यात आली आणि चाचणीत सर्व खेळाडू निगेटिव्ह आले आहेत.धोनी आणि रैनाने 15 ऑगस्टला चेन्नई पोहोचल्यानंतर संन्यास घेण्याचा निर्णय घेतला होता. दोन्ही खेळाडूंच्या या निर्णयामुळे सर्व चाहते हैराण झाले होते. गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी एमएस धोनीला त्यांच्या इंटरनेशनल करिअर आणि भविष्यासाठी शुभेच्छा देत लेटर लिहिलं.

दै.झुंजारनेताच प्रत्येक लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी लिंक वर प्रेस करा