क्रीडा

सचिन 2 लाख रुपयांना असणाऱ्या ‘त्या’ गाडीच्या प्रेमात!

20 Aug :- भारतरत्न सचिन तेंडुलकर आज जभरातील असामान्य क्रिकेटपटू आहे.क्रिकेटमधील जवळपास सर्वच रेकॉर्ड आपल्या नावे करणारा विक्रमादित्य सचिन आज कुठल्याही स्वप्ना पासून दूर नाही. जगभरातील सर्वच ऐशवर्य सचिनने कमवले आहे.मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर भारतातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंपैकी एक आहे. अनेक गाड्या,बंगले,असताना देखील आज सचिनला प्रिय असलेली गाडी हवी असल्याची माहिती एका मुलाखती दरम्यान मिळाली आहे.

दै.झुंजारनेताच प्रत्येक लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी लिंक वर प्रेस करा

आजही सचिन आपल्या पहिल्या गाडीला विसरू शकला नाही आहे.सचिननं नुकत्याच एका मुलाखतीत लहानपणापासून गाड्यांची आवड असल्याचे सांगितले. त्यामुळे काही सामने खेळून सचिननं पैसे जमवले आणि खरेदी केली पहिला गाडी. ती गाडी होती मारूती 800. आजही सचिनला आपल्या या गाडीची आठवण येते. मात्र सचिनकडे आता ही गाडी नाही आहे.मात्र, सचिननं या मुलाखतीत आपली गाडी परत मिळवण्याची इच्छा बोलून दाखवली. तसेच चाहत्यांना आवाहन केले की, या गाडीबाबत कोणाला काही माहिती असेल तर त्यांनी सांगावे.

हे वाचा:- आंघोळीला जातो सांगून करोना रुग्ण पळाला

सचिनने सांगितले की त्याच्या घरासमोर एक मोठा ड्राईव्ह-इन हॉल असायचा जिथे लोक गाड्या पार्क करायचे आणि चित्रपट बघायला जायचे. घराच्या बाल्कनीतून तो मोठ्या भावासोबत तासन् तास उभे राहून गाड्या पहात असे.डॉन ब्रॅडमन यांच्या 29 कसोटी शतकांच्या रेकॉर्डची बरोबरी केल्यानंतर ऑटोमाबाईल कंपनी फिएटनं फरारी गिफ्ट केली होती. फिएटने या गिफ्ट कारची आयात शुल्क भरण्यास नकार दिला.

अशा परिस्थितीत सचिनला 8.30 कोटी रुपयांच्या कारसाठी आयात शुल्क म्हणून 2 कोटी रुपये द्यावे लागले.2011 मध्ये 8000 किमी चालवल्यानंतर सचिनने ही फरारी सूरतमधील एका व्यापाऱ्याला 1.2 कोटींना विकली.