VIDEO – रस्त्याच्या दुतर्फा आग, अंगावर ठिगण्या उडत असूनही त्यानं गाडी थांबवली नाही!
20 ऑगस्ट: अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यात सध्या निसर्गाचे रौद्ररुप पाहायला मिळत आहे. येथील सॅन फ्रॅन्सिस्को शहरातील जंगलात भीषण आग लागली आहे. सुमारे 72 तास हे अग्नीतांडव सुरू आहे. या आगीमुळे 10 हजारहून अधिक झाडं जळून खाक झाली आहेत. तर, जंगलातील प्राणीही रस्त्यावर आल्याचे दिसत आहे.
(महाराष्ट्रासाठी शरमेची घटना, औरंगाबादच्या MGM रुग्णालयात महिला डॉक्टरासोबत धक्कादायक प्रकार)
कॅलिफोर्नियाच्या आगीचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र हा व्हिडीओ पाहून धडकी भरेल. या व्हायरल व्हिडीओमध्ये सॅन फ्रॅन्सिस्कोतील प्रसिद्ध नॅपा व्हॅलितील भीषण आग दिसत आहे. रस्त्याच्या दुतर्फा आगी लागली असूनही त्या आगीतून एक इसम गाडी चालवताना दिसत आहे. गाडी चालवत असताना, त्याच्या अंगावर ठिणग्याही उडत आहेत. मात्र त्यानं गाडी थांबवली नाही.
हा व्हिडीओ सॅन फ्रॅन्सिस्कोतील पत्रकार जस्टिन सुलीवन यांनी ट्विट केला आहे. या व्हिडीओमध्ये सॅन फ्रॅन्सिस्कोतील आगीचे भीषण रुप दिसत आहे. एवढेच नाही तर उत्तरेकडील, फेअरफिल्ड आणि व्हॅकव्हिली जवळ 46 हजार एकर परिसराला आग लागली. वाऱ्यामुळे ही आग एका रात्रीत पसरली. यात कमीतकमी 50 घरे आणि इतर इमारती जाळून खाक झाल्या आहेत.
मध्य कॅलिफोर्नियामध्ये सॅन फ्रान्सिस्कोच्या दक्षिणेस सुमारे 160 मैल (258 कि.मी.) दक्षिणेकडील फ्रेस्नो काउंटीमध्ये हेलिकॉप्टरमधून पाण्याचा फवारा करण्यात येत होते, यावेळी एका विमानाचा अपघात झाला. या अपघाचात कॅलिफोर्नियाच्या वनीकरण व अग्निसुरक्षा विभागाच्या एका खाजगी कंत्राटदार पायलटचा मृत्यू झाला.