बीड

महाराष्ट्राचे कोरोना अपडेट!

19 Aug :- राज्यात दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा कहर वाढत आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या कहरामुळे मानवी आयुष्य पूर्णतः विस्कळीत आणि उध्वस्त होऊ लागले आहे.कोरोनमुक्त होणाऱ्यांची वाढती संख्या दिलासादायक आहे. मात्र दिवसेंदिवस वाढत असलेली कोरोनाबाधित रुग्णवाढ चिंतेचं वातवरण निर्माण करत आहे.आज राज्यात चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. गेल्या 24 तासांत 13,165 नवे कोरोनारुग्ण राज्यात सापडले आहेत.

(हे वाचा:- व्हेंटीलेटरवरील नवजात बालक 22 दिवसांनंतर कोरोनामुक्त)

सध्या सर्वाधिक ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आहेत. बरे होण्याचं प्रमाण वाढत असलं, तरी रुग्णवाढीचा दर आणि हा विषाणू गावागावात पसरण्याचा आवाका वाढला आहे. गेल्या 24 तासांत 9011 रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत 4,46881 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात आज 346 रुग्णांचा मृत्यू झाला असून राज्यातील मृत्यूदर 3.35 टक्के एवढा आहे.

(हे वाचा:- सुखद! ‘या’ महिन्यामध्ये मिळणार भारतीयांना कोरोना लस)

राज्यात 11,62450 रुग्ण विलगीकरण मध्ये आहेत. 37094 संस्थात्मक विलगीकरणात आहेत.राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या आता 6,28,642 झाली आहे. तर मृत्यूचा आकडा 21033 वर गेला आहे. राज्यभरात उपचार सुरू असलेले तब्बल 1,60,413 रुग्ण आहेत.

(हे वाचा:-ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी एसटी बसेसला परवानगी)


एकीकडे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढत असलं, तरी संसर्ग वेगाने पसरतो आहे, हे आजच्या आकडेवारीने स्पष्ट झालं. देशाच्या Recovery Rate पेक्षा महाराष्ट्राचा अद्याप जास्त आहे. देशाच्या सरासरी मृत्यूदरापेक्षा महाराष्ट्राचा मृत्यूदरही अधिक आहे. राज्यातला मृत्यूदर 3.35 एवढा झाला आहे. देशाचा सरसारी कोविड मृत्यूदर 2 टक्क्यांच्या खाली आहे.