क्रीडा

धक्कादायक! आणखी एका भारतीय क्रिकेटपटूचे निधन

19 Aug :- यंदाचं २०२० हे वर्ष संपूर्ण मानव जातीकरिता शापित ठरले आहे.अनेक धक्कादायक आणि चिंताजनक घटना २०२० या वर्षांमध्ये घडल्या आहे. चारच दिवसांपूर्वी भारताचे माजी सलामीवीर आणि उत्तर प्रदेशमधील योगा सरकारमधील कॅबिनेट मंत्री चेतन चौहान यांचे निधन झाले होते.

(हे वाचा:- धक्कादायक! कोरोनाने घेतला माजी क्रिकेटपटूंचा बळी)

चौहान यांच्या नंतर आता आणखी एका माजी क्रिकेटपटूच्या निधनाची बातमी आली आहे. या क्रिकेटपटूच्या निधनावर भारताचा कसोटी संघाचा माजी कर्णधार अनिल कुंबळे यांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली आहे.बुधवारी माजी क्रिकेटपटू गोपालस्वामी कस्तुरीरंजन यांचे निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.

(हे वाचा:- स्वतंत्र्यदिनी क्रिकेटप्रेमींना धक्का; माही,रैनाची क्रिकेटमधून)

कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेचे कोषाध्यक्ष आणि प्रवक्ता विनय मृत्यूंजय यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला कस्तुरीरंजन यांचे निधन झाल्याची माहिती दिली.चामराजापेट येथील निवासस्थानी त्यांचे निधन झाले. कस्तुरीरंजन यांनी भारतीय क्रिकेटमध्ये एक खेळाडू, प्रशासक आणि क्युरेटर म्हणून भूमिका पार पाडली होती.

(हे वाचा:- प्रकृती चिंताजनक!भारतीय क्रिकेटपटू व्हेंटिलेटरवर)

जलद गोलंदाज असलेले कस्तुरीरंजन यांनी रणजी स्पर्धेत १९४८ ते १९६३ या काळात म्हैसूर कडून सामने खेळले होते. त्यांनी प्रथम श्रेणीत ३६ सामन्यात ९४ विकेट घेतल्या. ४२ धावात ६ विकेट ही त्यांची सर्वोच्च गोलंदाजी होती.

(हे वाचा:प्रकृती चिंताजनक! संजू लीलावती रुग्णालयात दाखल)