भारत

भारताचे कोरोना अपडेट!

19 Aug :- देशातील एकूण कोरोना (coronavirus) रुग्णांची संख्या वाढून आता 27 लाख 67 हजार 274 झाली आहे. आज एकाच दिवसात 64 हजार 531 रुग्ण सापडले. तर, 1092 रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या देशात 6 लाख 76 हजार 514 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दिलासादायक बाब म्हणजे देशातील निरोगी रुग्णांची संख्या आता 20 लाख 37 हजार 871 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 73.64% झाला आहे.

(हे वाचा:- स्वतंत्र्यदिनी क्रिकेटप्रेमींना धक्का; माही,रैनाची क्रिकेटमधून)

देशात आतापर्यंत 52 हजार 889 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. भारतात चाचणी आणि आयसोलेशनच्या दिशेने जलद काम केले गेले आहे, ज्याचा परिणाम वाढती रिकव्हरी रेट वाढत आहे. तर मृत्यूदर घटला आहे. अॅक्टिव्ह रुग्ण आणि रिकव्हर रुग्णांमधील फरक सुमारे 13 लाख आहे. मंगळवारी पहिल्यांदाच देशात 9 लाखाहून अधिक चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

(हे वाचा:- सुखद! स्वदेशी कोरोना लशीची मानव चाचणी सफल)