महाराष्ट्र

व्हेंटीलेटरवरील नवजात बालक 22 दिवसांनंतर कोरोनामुक्त

19 Aug :- कोरोना विषाणूचा कहर दिवसेंदिवस वाढत असला तरी कोरोनमुक्त होणाऱ्यांची आकडेवारी सुखावणारी आहे.त्यामुळे कोरोना विषाणूची भीती न बाळगता आता पुढे आयुष्य जगणे गरजेचे आहे. जन्माला येताच कोरनाबाधित झालेल्या एका बाळानं व्हेंटिलेटरच्या मदतीने तब्बल 22 दिवस दिलेला लढा यशस्वी ठरलाय. 35 दिवस आयसीयुमध्ये उपचार घेतल्यावर हे बाळ पुर्ण बरं झालंय. या बाळावर पुण्यातील भारती हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले.

(हे वाचा:-धक्कादायक! राज्यातील कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांमध्ये दिसु ‘ही’ नवी लक्षणं)

12 जुलैला प्रकाश सूर्यवंशी आणि आकांक्षा सूर्यवंशी यांना मुलगा झाला. परंतु जन्मताच बाळाला श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्याला उपचारासाठी पूणे येथील भारती हॉस्पिटलमध्ये भरती केलं असता बाळाची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली. त्याचबरोबर बाळाला न्युमोनिया झाल्याचही उघड झालं.बाळाच्या फुफ्फुसांमध्ये अनेक प्रकारच्या गुंतागुंत निर्माण झाल्या. त्यानंतर या बाळावरती भारती हॉस्पिटलच्या एनआयसीयुमध्ये उपचार सुरू झाले.

(हे वाचा:- महाराष्ट्राचे ‘सुखद’ कोरोना अपडेट्स)

महत्त्वाचं म्हणजे हे बाळ प्री मॅच्युअर बेबी होतं म्हणजे वेळेआधीच जन्माला आलं होतं. त्यामुळे या बाळाचं वजन जन्मावेळी फक्त 1.8 किलो इतकं होतं. श्वास घेता यावा यासाठी एवढ्या लहान बाळाला व्हेंटिलेटरची मदत देण्यात आली. त्याचबरोबर शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित व्हावा यासाठी सर्फेंक्ट नावाच्या विशेष औषधाचे दोन डोसही देण्यात आले आहे . हे सर्व होऊनही बाळाला शंभर टक्के ऑक्सीजन आवश्यक होता. त्यासाठी त्याला हाय फ्रिक्वेन्सी व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आलं तरीही ऑक्सिजनचा पुरवठा पुरेसा ठरत नसल्यामुळे बाळाला नायट्रिक ऑक्साइड नावाचा एक विशेष वायू देखील देण्यात आला.

(हे वाचा:-सुखद! ‘या’ महिन्यामध्ये मिळणार भारतीयांना कोरोना लस)

त्याचबरोबर बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी यासाठी इंट्राव्हेनस इम्युनोग्लोबोलीन ही एक विशेष थेरपी देखील करण्यात आली . डॉक्टरांकडून एवढे सगळे उपाय करण्यात आल्यानंतर हे बाळ उपचारांना प्रतिसाद द्यायला लागलं.सलग 22 दिवस व्हेंटिलेटरवर राहिल्यानंतर बाळ स्वतः श्वासोच्छवास करण्यास सक्षम झालं आणि त्यामुळे बाळाचा वेंटिलेटर काढण्यात आला असं बाळावरती उपचार करणाऱ्या डॉक्टर प्रदीप सूर्यवंशी यांनी सांगितलं.आणि अखेर 22 दिवसांनंतर व्हेंटीलेटरवरील नवजात बालक कोरोनामुक्त झालं.