सिनेमा,मनोरंजन

देशद्रोही चित्रपट बनवणाऱ्या करणचा पद्मश्री काढून घ्यावा-कंगना

20 Aug :- हिंदी चित्रपट सृष्टीतील आघाडीची अभिनेत्री कंगना नेहमीच आपल्या निर्भीड आणि बिनधास्त वक्तव्यामुळे चर्चेत असते.कंगनाच्या या स्वभावामुळे ती अनेकदा वादाच्या भौऱ्यात देखील अडकलेली आहे.मात्र कुठल्याही परिणामाची पर्वा न करता चुकीच्या गोष्टीवर आवाज उठवणारी आणि नेहमीच चांगल्या गोष्टींचे समर्थन करणाऱ्या कंगनाने हिंदी चित्रपट सृष्टीतील दिग्गज चित्रपट निर्माता,दिग्दर्शक,करण जोहरवर संताप व्यक्त केला आहे.

हे वाचा- (कंगनाचा अमिर खानवर कडक प्रहार!)

देशद्रोही चित्रपट बनवणाऱ्या करणचा पद्मश्री काढून घ्यावा अशी मागणी देखील कंगनाने केली आहे. गेल्या काही दिवसांपासून गुंजन सक्सेना चित्रपटावरून वाद निर्माण होत आहे. गुंजन सक्सेना फिल्ममध्ये वास्तव घटना मोडूनतोडून दाखवण्यात आल्याचं सांगितलं जातं आहे आणि आता याच चित्रपटावरून कंगनाने करणला पुन्हा लक्ष्य केलं आहे.

हे वाचा- (दृश्यम’ फेम निशिकांत कामत यांचे निधन)

करणने या फिल्मची निर्मिती केली आहे.कंगना रणौतच्या टिमने ट्वीट केलं आहे. कंगना म्हणाली, “करण जोहरचा पद्मश्री पुरस्कार काढून घ्यावा, अशी विनंती मी भारत सरकारला करते. त्याने एका आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर बोलताना मी ही इंडस्ट्री सोडून जाण्याबाबत भाष्य केलं होतं. त्याने सुशांतचं करिअर संपवलं, उरी हल्ल्यावेळीही त्याने पाकिस्तानला पाठिंबा दिला होता आणि आता आपल्या भारतीय सैन्याबाबत देशद्रोही फिल्म बनवली आहे”गुंजन सक्सेना हा चित्रपट वादात आहे.

आपलं नकारात्मक चित्रण केल्याप्रकरणी भारतीय हवाईदलाने यावर नाराजी व्यक्त केली होती. तसंच गुंजन सक्सेनासोबत भारतीय हवाई दलात प्रशिक्षण घेतलेल्या श्रीविद्या राजननेही या फिल्मवर आक्षेप घेतला. कारगिलवेळी विमान उडवण्यात आपण पहिले होतो गुंजन नाही असा दावा तिने केला आहे. शिवाय चित्रपटात पंजा लढवण्याचा सीन दाखवण्यात आला आहे, तसं काहीच झालं नव्हतं असंही तिनं सांगितलं. गुंजन सक्सेना फिल्ममध्ये वास्तव घटना मोडूनतोडून दाखवण्यात आल्याचं श्रीविद्याचं म्हणणं आहे.